-MPC-TOP-MOST-BANNER-I

pimpri : खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी घेतला शहरातील कोरोना परिस्थितीचा आढावा

महापालिकेच्या 'कोरोना वॉर'रुमची पाहणी

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – शिरुरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आज (शुक्रवारी) पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या ‘कोविड 19 वॉर रुम’ ला भेट दिली.  कोरोना प्रतिबंधाच्या दृष्टीने महापालिका करीत असलेल्या विविध उपाययोजनांची माहिती  घेत त्यांनी  आयुक्तांना विविध सूचना दिल्या.

विरोधी पक्षनेते नाना काटे, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, नगरसेवक पंकज भालेकर, नगरसेविका सीमा सावळे, सुलक्षणा धर, आशा शेंडगे, अनुराधा गोफणे, माजी महापौर संजोग वाघेरे, माजी उपमहापौर प्रभाकर वाघेरे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, अजित पवार, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, संदीप खोत, लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे आदी उपस्थित होते.

डॉ. अमोल कोल्हे यांनी कोरोना बाबत  अडचणी, समस्यांबाबत  विचारणा केली. त्यावर आयुक्त हर्डीकर यांनी कोरोनाची सुरुवात झाल्यापासून ते आत्तापर्यंत केलेली कार्यवाही, आलेल्या अडचणी त्यावर मार्ग काढून केलेल्या कामाबद्दल सविस्तर माहिती दिली.

कोरोना वॉर रुममध्ये रुग्णांची अद्यावत माहिती उपलब्ध असून ती शहरातील सर्व नगरसेवकांना रोजच्या रोज उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यामध्ये बाधित रुग्ण, बरे झालेले रुग्ण, मयत रुग्ण संख्या, कंटेनमेंट झोन माहिती व नकाशा आदींबाबत माहितीचा समावेश असतो.

महापालिकेने राबविलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक कामगिरीबाबत समाधान व्यक्त करत डॉ. कोल्हे म्हणाले,  नागरिकांनी प्रशानाला आत्तापर्यंत सहकार्य केले आहे. यापुढेही असेच सहकार्य केल्यास आपण कोरोनावर नक्की विजय मिळवू,  असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1POST DOWn