Pimpri : खासदार श्रीरंग बारणे यांची संसदेच्या फायनान्स कमिटीच्या सदस्यपदावर नियुक्ती

एमपीसी न्यूज – मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांची भारतीय संसदेच्या फायनान्स कमिटीच्या स्थायी सदस्य पदावर नियुक्ती झाली आहे. कमिटीचे अध्यक्ष म्हणून माजी अर्थ राज्यमंत्री जयंत सिन्हा यांची निवड करण्यात आली आहे. यामुळे मावळसह महाराष्ट्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

संसदेच्या फायनान्स कमिटीचे गठन करण्यात आले आहे. यामध्ये एकूण 31 सदस्य आहेत. लोकसभेतील 21 तर राज्यसभेतील 10 सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे यांची देखील नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांमध्ये या समितीचा मोठा वाटा असतो. या समितीवर अभ्यासू आणि धुरंदर खासदारांची निवड करण्यात येते.

निवड झालेल्या सदस्यांमध्ये लोकसभेतून एस एस अहलुवालिया, सुभाष चंद्र बहेरिया, वल्लभनेनी बालशौरी, श्रीरंग बारणे, डॉ. सुभाष रामराव भामरे, सुनीता दुग्गल, गौरव गोगोई, सुधीर गुप्ता, दर्शना विक्रम जरदोष, मनोज किशोरभाई कोटक, पिनाकी मिश्रा, पी व्ही मिधून रेड्डी, सौगता रॉय, गोपाल चीनय्या शेट्टी, जयंत सिन्हा, डॉ. किरीट प्रेमजीभाई सोलंकी, मनीष तिवारी, पी वेलूसमय, प्रवेश साहिब सिंग वर्मा, राजेश वर्मा, गिरिधारी यादव यांची निवड करण्यात आली आहे. तर राज्यसभेतून राजीव चंद्रशेखर, ए नवनीतक्रिष्णन, प्रफुल्ल पटेल, अमर पटनाईक, महेश पोद्दार, सी एम रमेश, टी के रंगराजन, जी व्ही एल नरसिम्हा राव, दिग्विजय सिंग, अंबिका सोनी या दहा जणांची निवड करण्यात आली आहे.

खासदार श्रीरंग बारणे यांची सलग दुस-यांदा खासदार म्हणून निवड झाली आहे. दिग्गजांचा पराभव करून त्यांची ऐतिहासिक विजय मिळवला आहे. तसेच त्यांचा सलग पाच वर्ष ‘संसदरत्न’ पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे. त्यांची कामाची निष्ठा आणि लोकसभेतील अनुभव पाहता त्यांच्यावर ही जबाबदारी देण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.