Pimpri : 43 वर्षीय रुग्णावर मूत्रपिंड प्रत्यारोपणाची आव्हानात्मक व दुर्मिळ शस्त्रक्रिया यशस्वी

पिंपरीतील डॉ. डी. वाय पाटील रुग्णालयाच्या डॉक्टरांची कामगिरी

एमपीसीन्यूज:डॉ. डी वाय पाटील रुग्णालय व संशोधन केंद्र पिंपरी पुणे येथे एका 43 वर्षीय पुरुषाला त्यांच्या पत्नीने मूत्रपिंड देऊन नवे जीवन दिले. या रुग्णांच्या मूत्रपिंड प्रत्यारोपणात फार गुंतागुंत व अति जोखीम होती यावर मात करीत एक आव्हानात्मक व दुर्मिळ शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली.  अश्या प्रकारच्या दुर्मिळ मूत्रपिंड प्रत्यारोपणाची देशात 5 ते जगभरात 14 प्रकरणे नोंदविली आहेत. अत्यंत गुंतागुंतीची व अवघड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी रित्या पूर्ण केल्याबद्दल रुग्णालयाच्या(Pimpri) प्रत्यारोपण शल्य चिकित्सकांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

 

43 वर्षीय पुरुष रुग्ण चिखली भागात पाणीपुरीचा व्यवसाय करीत आहे.  गेली 3 वर्षांपासून ते मूत्रपिंड विकाराने त्रस्त होते. त्यांचे दोन्ही मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे ते डायलिसिस करीत होते. त्यांच्या रक्तशुद्धीकरण प्रक्रियेमध्ये रक्ताची गुठळी तयार होऊ लागल्याने शरीरातील मुख्य रक्त वाहिनी(शिरा) रक्त साखळून या कालांतराने पूर्णपणे बंद पडल्या याला ‘थ्रॉम्बोसिस’ म्हणजे सर्वसामान्य भाषेत रक्तवाहिनीमध्ये रक्ताची गुठळी (थ्रॉम्बस) तयार झाली होती. डायलिसिस साठी रक्त वाहिनी मिळत नव्हती इतके की पोटाकडून हृदयाकडे जाणारी प्रमुख वाहिन्या सुद्धा रक्त साखळून बंद पडली होती.

त्यामुळे डायलिसिस करण्यासाठी जागाच नव्हती डायलिसिस ही अवघड व कठीण झाले होते. प्रत्यारोपण करण्यासाठी त्यांच्या 42 वर्षीय पत्नीने स्वतःहून मूत्रपिंड देण्यास पुढे आल्या सर्व कायदेशीर प्रक्रियेतील व सर्व तपासण्या पूर्ण झाल्या प्रत्यारोपणासाठी सर्व जुळले मात्र समस्या या होत्याच रुग्णावर मूत्रपिंड प्रत्यारोपण करणे हाच एक शेवटचा पर्याय जरी असला तरी पुढील जोखीम ही फार मोठी  होती रुग्णांच्या छाती पासून ते कमरेपर्यंतच्या मूत्रपिंडाला जोडणारी रक्त वाहिन्या बंद असल्यामुळे मूत्रपिंड जोडण्यासाठी रक्तवाहिनी मिळणे हे फार अवघड काम होते आणि प्रत्यारोपण कसे करायचे हा ही प्रश्न होताच. दिवसेन दिवस रुग्णांची प्रकृती ही अस्थिर(Pimpri) होऊ लागली होती.

 

PCMC : शिपायाने सात वर्षे मारली दांडी, पालिकेने केले बडतर्फ

 

थ्रॉम्बोसिस मुळे अवयव जोडण्यास अडचणी होत्या त्याकरिता योग्य जागा शोधणे हे मोठे आव्हान  होते  येथील कुशल अनुभवी तज्ज्ञ, अद्ययावत तंत्रज्ञान यामुळे शक्य होऊ शकले रुग्णांच्या सर्व चाचण्या आणि स्कॅन केल्यानंतर रक्तवाहिन्यांचे बारकाईने परीक्षण केले. सर्व मूल्यमापन करून रक्तवाहिनी बसविण्यासाठी फक्त एक ‘दीड’ इंचाची जागा मिळाली  जिथे त्यांच्या पत्नीचे मूत्रपिंड काढून रक्तवाहिनीला जोडले  गेले . या रुग्णालयात पहिल्यादांच अशी अनोखी  शस्त्रक्रिया झाली त्यामुळे दाता व प्राप्तकर्ता दोघांचे ही  पुढील धोके टाळणे शक्य झाले.

 

“आम्ही जबाबदारीने आमच्या समोरील हे मोठे आव्हान पेल आहे.  अश्या प्रकारच्या शस्त्रक्रियेसाठी आमच्या संपूर्ण टीमने पूर्ण क्षमतेने प्रयत्न करीत हे प्रत्यारोपण यशस्वी केले याचा आम्हाला मनापासून अभिमान वाटतो.  दाता व प्राप्तकर्ता या दोघांची प्रकृती ठणठणीत आहे.  आमच्या रुग्णालयातील कुशल व अनुभवी तज्ञ् स्टाफ तसेच सर्व अद्ययावत सेवा सुविधा व तत्पर रुग्ण सेवेमुळे हे यश मिळाले आहे ” असे रुग्णालयाच्या प्रत्यारोपण विभागाच्या प्रमुख व प्रमुख सर्जन डॉ वृषाली पाटील यांनी सांगितले त्या पुढे म्हणाल्या ही शस्त्रक्रिया सात तासात पूर्ण झाली. अश्या प्रकारच्या दुर्मिळ मूत्रपिंड प्रत्यारोपणाची देशात 5 ते जगभरात 14 प्रकरणांची नोंद आहे. आमच्या विभागाद्वारे हॉस्पिटलमध्ये आतापर्यंत एकूण 273 विविध प्रकारच्या अवयवाचे प्रत्यारोपण झाले आहे. अवयवदान व बहु अवयव प्रत्यारोपण प्रक्रियेत पिंपरीतील डॉ डी वाय पाटील हॉस्पिटल अग्रेसर असून आतापर्यत केलेल्या रुग्णांच्या बहु अवयव प्रत्यारोपणात कमालीचे यश मिळाले आहे.

 

अतिशय अवघड प्रत्यारोपण शस्त्रक्रियेत मिळालेल्या यशाबद्दल पिंपरीतील डॉ. डी. वाय पाटील विद्यापीठाचे डॉ. पी. डी. पाटील, डॉ भाग्यश्री पाटील, विश्वस्त व खजिनदार डॉ. यशराज पाटील यांनी  सर्वंच टीमचे अभिनंदन व कौतुक केले आहे.

 

“माझ्या पत्नीने किडनी दिली तिचे तर मी धन्यवाद मानतो, पण बाकीच्या आरोग्यच्या गंभीर समस्या या मोठ्या होत्या.  माझी जगण्याची आशा सुटली होती.  जे अशक्य होते ते आज डॉक्टरांनी शक्य केले.  डॉ डी वाय पाटील हॉस्पिटल मधील डॉक्टरांनी माझी शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली आणि आज माझा पुनर्जन्म झाला आहे. मी त्यांचा कायम ऋणी राहील” ही भावना रुग्णाने व्यक्त(Pimpri) केली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.