Pimpri: MPSC च्या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर; राज्यसेवा पूर्व परीक्षा 13 सप्टेंबरला

MPSC announces revised schedule of examinations; State service pre-examination on 13th September

एमपीसी न्यूज – कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी केलेल्या लॉकडाउनमुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा स्थगित केल्या होत्या. आयोगाने आज (बुधवारी) परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार राज्यसेवा पूर्व परीक्षा 13 सप्टेंबरला, दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 11 ऑक्टोबर आणि अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा 1 नोव्हेंबर रोजी होणार आहे.

राज्यातील कोरोनाचा वाढता प्रसार पाहता एमपीएससीने नियोजित परीक्षा स्थगित केल्या होत्या. त्यानंतर अनेकांकडून परीक्षा घेण्याची मागणी केली जात होती.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे.

त्यानुसार राज्यसेवा पूर्व परीक्षा 13 सप्टेंबर, दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 11 ऑक्टोबर आणि अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा 1 नोव्हेंबर रोजी होणार आहे.

परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाल्याने राज्यातील स्पर्धा परीक्षा उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.

कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या स्थितीच्या संदर्भात सरकारकडून वेळोवेळी राबविण्यात येणा-या उपाययोजना आणि लॉकडाउनचा आढावा घेण्यात येईल.

त्यानुसार परीक्षेच्या आयोजनाच्या अनुषंगाने आयोगाकडून वेळोवेळी फेरआढावा घेण्यात येईल. तसेच याबाबतची माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल, असे परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.