Pimpri : राज्यात थ्रो-बॉल स्पर्धेसाठी मृणाल लांडगे हिची कर्णधारपदी निवड

एमपीसी न्यूज – राज्य सब- ज्युनियर थ्रो-बॉल स्पर्धेसाठी चिंचवडमधील सेंड अॅन्ड्रुज शाळेच्या मृणाल नरेंद्र लांडगे हिची पुण्याच्या ज्युनियर गटाच्या कर्णधारपदी निवड झाली आहे.

शनिवारी (दि. 16 फेब्रुवारी) रत्नागिरी येथे थ्रो – बॉलच्या राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. पुणे जिल्हा संघाचे नेतृत्व करण्याची संधी पहिल्यांदाच पिंपरी चिंचवडच्या खेळाडूला मृणाल लांडगेच्या रुपात मिळाली आहे.

प्रशिक्षक राजेंद्र मागाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सेंट अॅन्ड्रयुज आरुषा गाडे, श्रेया सोमाणी, तनिष्का पाटील, अबोली बोंबले, समृध्दी मोरे यांचीही राज्य सब- ज्युनियर थ्रो – बॉल स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.