HB_TOPHP_A_

Pimpri : महापालिकेचा अर्थसंकल्प वास्तववादी असणार , आकड्यांचा फुगवटा कमी होणार

मुख्य लेखाधिकारी जितेंद्र कोळंबे यांची ग्वाही

204

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेचा सन 2019-2020 या आगामी वर्षाचा अर्थसंकल्प फेब्रुवारी महिन्यात स्थायी समिती समोर सादर केला जाणार आहे. यंदाचा अर्थसंकल्प वास्तववादी सादर करत आकड्यांचा फुगवटा कमी करणार असल्याची ग्वाही मुख्य लेखाधिकारी जितेंद्र कोळंबे यांनी दिली. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाचा अर्थसंकल्प फुगत जाऊन पाच हजार कोटीपर्यंत पोहचणार नाही. तसेच गेल्या आर्थिक वर्षातील शिल्लक रकमेची विकास कामे येत्या दोन महिन्यात करण्यावर भर दिला जाणार असल्याचेही ते म्हणाले.

HB_POST_INPOST_R_A

पिंपरी -चिंचवड महापालिकेच्या आगामी वर्षाच्या अर्थसंकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. क्षेत्रीय कार्यालये तसेच महापालिकेतील विविध विभागांची अर्थसंकल्पीय जुळवणी सुरू आहे. फेब्रुवारीच्या दुस-या आठवड्यात हा अर्थसंकल्प स्थायी समितीपुढे सादर केला जाण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मूळ 3506 कोटी, तर केंद्राच्या विविध योजनांसह 5263 कोटींचा आणि 181 कोटी रुपये शिलकीच्या अर्थसंकल्प सादर केला होता.

आगामी लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता मार्चमध्ये लागू होणार असल्याने तत्पुर्वी अर्थसंकल्प मंजूर व्हावा यासाठी आयुक्त हर्डीकर प्रयत्नशील आहेत. विविध नागरी कामांसाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या मिळणा-या अनुदानामुळे गेल्या काही वर्षात पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अर्थसंकल्पाने कोटीच्या कोटी उड्डाणे घेतली आहेत. तथापि, जेएनएनयुआरएम अभियान संपुष्टात आल्याने यंदाचा अर्थसंकल्प जमिनीवर येण्याची शक्यता आहे.

महापालिकेचे मुख्य लेखाधिकारी जितेंद्र कोळंबे म्हणाले, ”सन 2019-2020 या आगामी वर्षाच्या अर्थसंकल्पाचे काम सुरू आहे. यंदाचा अर्थसंकल्प वास्तववादी असणार आहे. विविध विभाग अनावश्यक तरतूदी करतात. त्या तरतूदी खर्चीही पडत नाहीत. तरतूदी वर्गीकरणाची वेळ अनेका येते. आगामी अर्थसंकल्पात योग्य प्रकल्प, विकास योजनांवर पुरेशा तरतूदी केल्या जाणार आहेत. फुगीर आकडे अर्थसंकल्पात नसतील. आवश्यक तेवढीच कामे शहराच्या हिताच्या दृष्टीने केली जाणार आहेत”.

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1

%d bloggers like this: