Pimpri: महापालिकेचा अर्थसंकल्प सोमवारी होणार सादर

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेचा सन 2020-21 या आर्थिक वर्षांचा अर्थसंकल्प येत्या सोमवारी (दि.17) सादर होणार आहे. अर्थसंकल्पातून  नवीन काय मिळणार याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. महापालिकेचा हा 38 वा अर्थसंकल्प असणार आहे. तर,  आयुक्त श्रावण हर्डीकर यांचा तीसरा अर्थसंकल्प आहे.

सोमवारी सकाळी 11 वाजता विशेष स्थायी समिती सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेत आयुक्त श्रावण हर्डीकर अर्थसंकल्प सादर करणार आहेत. दरम्यान, मागील वर्षी मूळ 4, 620 कोटी तर केंद्र सरकारच्या पुरस्कृत योजनांसह 6, 183 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प होता. यंदा किती कोटींचा अर्थसंकल्प असेल. त्यामध्ये वाढ होणार की घट होणार, शहरवासीयांना नवीन काय मिळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, यंदाचा अर्थसंकल्प फुगीर नसणार आहे. वास्तववादी अर्थसंकल्प मांडण्याचा प्रयत्न केल्याचे मुख्य लेखाधिकारी जितेंद्र कोळंबे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.