Pimpri : महापालिका आयुक्तांची भाजप शहराध्यक्षासोबत विकास कामांची पाहणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेत प्रशासकीय (Pimpri)राजवट सुरू आहे. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना पायाभूत सोयी-सुविधा देण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम निश्चित करावा. ज्याद्वारे विकासकामांना गती देता येईल.

शहराच्या सर्वांगीण विकासासाच्या दृष्टीने सकारात्मक भूमिकेतून प्रकल्प मार्गी लावावेत, अशी सूचना भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी केली.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त तथा (Pimpri)प्रशासक शेखर सिंह यांच्या समवेत भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी नवी सांगवी परिसरातील विविध प्रस्तावित विकासकामांची पहाणी केली. पहाणी दौऱ्यामध्ये सांगवी, नवी सांगवी, पिंपळे गुरव आदी ठिकाणच्या विकासकामांचा आढावा घेतला.

Alandi: कार्तिकी एकादशी निमित्त माऊली मंदिरात फुलसजावटीच्या कामात कामगार मग्न

यावेळी माजी महापौर माई ढोरे, माजी स्थायी समिती सभापती राजेंद्र राजापूरे, माजी नगरसेवक सागर अंगोळकर, हर्षल ढोरे, उषा मुंडे, अंबरनाथ कांबळे, संतोष कांबळे, शारदा सोनावणे, श्री गणेश सहकारी बँकेचे संचालक संजय जगताप, माजी सिनेट सदस्य संतोष ढोरे, भाजपा शहर चिटणीस हिरेन सोनावणे, सामाजिक कार्यकर्ते जवाहर ढोरे यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते.

यावेळी सांगवी येथील संगमनगर, ममतानगरमार्गे बोपोडी, औंधकडे जाणाऱ्या पुलाच्या संदर्भात चर्चा झाली. या पुलाच्या बाबतीत कृषी विभागाच्या काही तांत्रिक अडचणी असून, त्या लवकरच मार्गी लावण्यात येतील. तसेच, मधुबन सोसायटी गल्ली नंबर 1 ते 9 येथील 12 मीटरचा रस्ता, नवी सांगवी येथील कृष्णा चौक येथे 20 मीटरच्या रस्त्यासंदर्भात तसेच रामनगर–यमुना सोसायटी, मयूर नगरीच्या शेजारचा रस्त्याच्या कामाला गती देण्याबाबतही चर्चा करण्यात आली.

शंकर जगताप म्हणाले की, नागरिकांना पायाभूत सुविधा सक्षमपणे उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रशासनाकडे सकारात्मक दृष्टीकोनातून आम्ही पाठपुरावा करीत आहोत. यामुळे शहरातील नागरिकांना मिळणाऱ्या सुविधा या दर्जेदार असाव्यात, यासाठी आम्ही नेहमीच आग्रही आहोत. किमान पुढील 50 वर्षांचा विचार करून प्रशासनाने मुलभूत सुविधांची निर्मिती करावी, अशी अपेक्षा आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.