Pimpri: महापालिका आयुक्तच सुरक्षित नाहीत तर नागरिकांचे काय? -दत्ता साने

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात साथीच्या आजाराने थैमान घातले आहे. थेरगाव येथे डेंग्यूने एकाच कुटूंबातील दोन सख्या भावांचा महिन्याच्या कालावधीत मृत्यू झाला आहे. नागरिकांचा मृत्यू होत असताना महापालिका प्रशासन झोपले आहे का? असा सवाल राष्ट्रवादीचे नगरसेवक दत्ता साने यांनी केला. काही दिवसांपूर्वी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना चिकनगुनियाची लागणा झाली होती. त्यावरुन ज्या शहरात महापालिकेचे आयुक्तच सुरक्षित नाहीत, तेथे नागरिकांचे काय? असेही साने म्हणाले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेची डिसेंबर महिन्याची सभा आज (शुक्रवारी) आयोजित करण्यात आली होती. सात दिवसांपूर्वी थेरगाव येथील उजेर हमीद मणियार (वय 4, रा. पडवळनगर, थेरगाव) या बालकाचा तर, त्याचा नऊ महिन्याचा लहान भाऊ अदनान हमीद मणियार याचा 16 नोव्हेंबर रोजी मृत्यू झाला होता. दोनही भावांचा डेंगूने मृत्यू झाला आहे. सभेच्या सुरुवातीला राष्ट्रवादीचे नगरसेवक दत्ता साने यांनी साथीच्या आजाराचा मुद्दा उपस्थित केला.

थेरगाव येथे एकाच कुटूंबातील एक नऊ वर्षांचा आणि दुसरा चार वर्षांचा मुलगा डेग्यूने मृत्यूमुखी पडला. शहरात लोक मरताना आपली महापालिका झोपा कढत आहे का?, मणियार कुटुबियाला आर्थिक मदत करण्यात यावी, अशी मागणीही साने यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.