Pimpri: महापालिकेतर्फे क्रांतिसूर्य महात्मा फुले यांना अभिवादन

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, नगरसेविका शर्मिला बाबर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय, सहाय्यक आयुक्त आशादेवी दुर्गुडे उपस्थित होते. तसेच, पिंपरी चौकातील महात्मा जोतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.