Pimpri: महापालिकेतर्फे बेघरांची पिंपरीत राहण्याची सोय

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे पिंपरीत बेघरांसाठी राहण्याची सोय उपलब्ध केली आहे. या ठिकाणी 100 जण राहू शकतात.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव राखण्यासाठी महापालिकेतर्फे विविध प्रभावी उपाययोजना केल्या जात आहेत. त्याचधर्तीवर पिंपरी-चिंचवड शहरातील ज्या नागरिकांना घर नाही. राहण्याची सोय नाही. अशा नागरिकांसाठी महापालिकेने राहण्याची सोय केली आहे.

पिंपरीतील इंदिरा गांधी पुल येथील जुन्या भाजी मंडई येथे राहण्याची सोय केली आहे. या ठिकाणी 100 नागरिक राहू शकतात. आज या ठिकाणी 12 नागरिक आहेत, अशी माहिती नागरवस्ती विभागाचे सहाय्यक आयुक्त उल्हास जगताप यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.