Pimpri : बांधकाम मजूरांचा महानगरपालिकेवर मोर्चा; अपघातात मृत्युमुखी झालेल्यांच्या नातेवाईकांना नुसकानभरपाई देण्याची केली मागणी

शिष्टमंडळाच्या वतीने अतिरिक्त आयुक्त, कामगार अधिकारी आणि पोलीस आयुक्त यांना दिले निवेदन

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील बांधकाम मजूरांची महानगरपालिकेच्या वार्ड ऑफिसमध्ये नोंदणी करून आणि रिनिव्हलचे कामकाज सुरु करावे. म्हाडा आणि इतर साईटवर झालेल्या अपघातात मुख्य मालक(बिल्डर) आणि म्हाडा अधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल करून मृत्युमुखी झालेल्यांच्या नातेवाईकांना नुसकानभरपाई द्यावी. नोंदणी झालेल्या बांधकाम मजुरांना कल्याणकारी योजनेचे लाभ देण्यात यावेत. नोंदणी नसताना बांधकाम साईटवर अपघात झाल्यास त्यांच्या वारसदारास अपघाती मृत्यूप्रमाणे त्यांच्या नातेवाईकांना लाभ देण्यात यावेत. पिंपरी-चिंचवड शहरातील बांधकाम कामगाराच्या नाक्यावर निवारा शेड, पाणी, टॉयलेटसह इतर विविध उपयोजना करण्यात याव्यात, यांसह इतर विविध मागण्यांसाठी बांधकाम मजूर, कष्टकरी कामगार पंचायतच्या वतीने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेवर मोर्चा काढण्यात आला.

यावेळी कष्टकरी कामगार पंचायतचे अध्यक्ष बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली आज, दि 24/7/2019 रोजी सकाळी 11 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरी ते महानगरपालिकापर्यंत मोर्चा काढण्यात आला. यावेळी शिष्टमंडळाने अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, कामगार अधिकारी, चंद्रकांत इंदलकर आणि पोलीस आयुक्त यांना मागण्याचे निवेदन दिले.

  • यावेळी पंचायत अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांच्यासह कार्याध्यक्ष बळीराम काकडे, कोषाध्यक्ष प्रल्हाद कांबळे, लालचंद पवार, प्रीती रोडे, भीमाशंकर शिंदे, मलिक शेख, लक्ष्मण शिंगाडे, नाना कांबळे आदी उपस्थित होते.

यावेळी बांधकाम मजुरांना मार्गदर्शन करताना बाबा कांबळे म्हणाले, बांधकाम मजुरांसाठी महाराष्ट्र शासनाने इमारत आणि इतर बांधकाम कामगार (रोजगार नियमन व सेवाशर्ती) अधिनियम 1996 चे कलम 12 (2) व महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार (रोजगार नियम व सेवाशर्ती) नियम 2007 मधील नियम 46 प्रमाणे बांधकाम मजुरांची नोंदणी करण्याचे अधिकार महानगर पालिका वार्ड अधिकारी यांना देण्यात आले आहेत. परंतु प्रत्येक्ष मात्र महानगरपालिकेत नोंदणी आणि रिनिव्हल आदी कोणतेच काम केली जात नाहीत. याबाबतची माहिती नाही, असे म्हणून अधिकारी जबाबदारी झटकत आहेत.  यामुळे बांधकाम मंजूर शासनाच्या योजनेपासून वंचित राहत आहेत. त्यांची नोंदणी नसल्यामुळे कोणतेही लाभ दिले जात नाही.

  • ज्याची नोंदणी झाली आहे, अशा बांधकाम मजुरांना रिनिव्हल करण्याच्या नावाखाली वेगवेगळे कागदपत्र मागून त्यांची अडवणूक केली जात आहे. कामगार कार्यालय आणि बांधकाम मंडळाच्या या लहरी कारभारमुळे गोर-गरीब कष्टकऱ्यांचे जीव धोक्यात जात आहेत. अनेकांना आपला प्राण गमवावे लागत आहे.अनेक ठिकाणी अपघातत बांधकाम मजुरांचे प्राण गमवावे लागत आहेत.

पुणे येथे झालेल्या दोन घटनांत 25 बांधकाम मजुरांचा मृत्यू झाला. पिंपरी चिंचवड येथे शासनाचा प्रकल्प असलेल्या म्हाडाच्या साईटवर अपघात एका मजुरांचा मृत्यू झाला असून दोन मजुर गंभीर जखमी आहेत. या मुख्य मालकांवर (बिल्डर) गुन्हा दाखल करण्याऐवजी ठेकेदारावर गुन्हा दाखल करून मुख्य मालक आणि म्हाडा अधिकारी यांना वाचवलं जात आहे. कामगार विभागाने तर कोणतीच कारवाही केली नाही.

  • वाकड येथील अन्य एक साईटवर 18/7/2019 रोजी अपघात होऊन देखील गुन्हा दाखल नाही. प्रकरण दाबण्याचे प्रयत्न सुरु आहेत. अशा प्रकारे बांधकाम मजुरांच्या जीवनाशी खेळ सुरू आहे. या सर्व प्रश्नासाठी पिंपरी येथे मोर्चा काढून निवेदन देण्यात येणार आहे.

मोर्चाद्वारे करण्यात आलेल्या मागण्यां पुढीलप्रमाणे :
1) पिंपरी-चिंचवड शहरातील बांधकाम मजुरांची महानगरपालिकेच्या वार्ड ऑफिसमध्ये नोंदणी करून आणि रिनिव्हलचे कामकाज सुरु करावे.
2) म्हाडा आणि इतर साईटवर झालेल्या अपघातात मुख्य मालक(बिल्डर) आणि म्हाडा अधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल करून मृत्युमुखी झालेल्ल्याच्या नातेवाईकांना नुसकानभरपाई द्यावी.
3) नोंदणी झालेल्या बांधकाम मजुरांना कल्याणकारी योजनेचे लाभ देण्यात यावेत .
4) मंडळाच्या वतीने 4 लाख कामगारांना घनबुट, हेल्मेट, सेफ्टी बेल्ट, जाळीसह सुरक्षा साधने देण्यात आली. (परंतु प्रत्यक्ष मात्र एकाही बांधकाम मजुराकडे सुरक्षा साधन नाहीत. हे ज्या ज्या ठिकाणी अपघात झाले आहेत. त्या ठिकाणी कामगारांच्या अंगावरवरील साधन नव्हतेच, हे सिद्ध झाले आहे.) मग, वाटप केलेल्या सुरक्षा साधन गेले कुठे? यांची चैकशी करावी.
5)पिंपरी चिंचवड शहरासाठी स्वतंत्र बांधकाम कल्यानं मंडळ चे कार्यालय सुरु करावे बांधकाम मजुरांची नोंदणी आणि लाभ देण्याची ऑनलाईन पद्धत सुरु करावी .
6)पिंपरी चिंचवड शहरातील धोकेदायक बांधकामाची यादी करून अपघात होण्यापूर्वीच आशा कामावर बंदी घालून स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये संबधित बिल्डर विरोधात कादेशीर कारवाई करावी .
7) नोंदणी नसताना बांधकाम साईटवर अपघात झाल्यास त्यांच्या वारसदारास अपघाती मृत्यूप्रमाणे लाभ देण्यात यावेत.
8) पिंपरी-चिंचवड शहरातील बांधकाम कामगाराच्या नाक्यावर निवारा शेड, पाणी, टॉयलेटसह इतर विविध उपयोजना करण्यात याव्यात.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.