Pimpri: मयत व्यक्तीच्या अंत्यसंस्काराचा खर्च महापालिकेने उचलावा

सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांची मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील हिंदू, मुस्लीम, शीख, इसाई, बौद्ध, लिंगायत, गवळी समाज, महानुभाव पंथ, गोसावी समाज नाथपंथी, बालीयान समाजाच्या लोकांसाठी सर्व स्मशानभूमी आणि दफनभूमीमध्ये मृत झालेल्या व्यक्तीच्या मृतदेहाच्या अंत्यसंस्काराची, दफन करण्याचा खर्च महापालिकेने करावा, असा ठराव तीन वर्षांपुर्वी महापालिकेत मंजूर झाला आहे. या ठरावाची त्वरित अंमलबजावणी करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केली आहे.

स्थायी समितीने 2016 मध्ये याबाबतचा ठराव केला आहे. त्याला महासभेने देखील मान्यता दिली आहे. या ठरावाची अंमलबजावणी करण्याचा आदेश देखील तत्कालीन आयुक्तांनी दिला होता. परंतु, आपल्या काळात या योजनेची अंमलबजावणी करण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जात होती. त्यामुळे जानेवारी 2018 रोजी महापालिकेसमोर जनआंदोलन करणार होतो. तथापि, तत्कालीन महापौर नितीन काळजे आणि आपण या मागणीबाबत आमची भूमिका सकारात्मक असून हा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, अद्यापही हा प्रश्न मार्गी लागला नाही.

  • या जनहिताच्या विषयांबाबत सत्ताधारी संवेदनशील नाहीत. या जनहिताच्या मागणीबाबत तातडीने योग्यते पाउल उचलावे. अन्यथा, आंदोलन केले जाईल, असा इशारा भापकर यांनी निवेदनातून दिला आहे. याबाबत महापालिकेचे सभागृह नेते एकनाथ पवार यांना निवेदन देण्यात आले आहे.
MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like