Pimpri : महानगरपालिकेच्या वतीने क्रांतिवीर दामोदर चापेकर यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने क्रांतिवीर दामोदर हरी चापेकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या चिंचवड येथील पुतळ्यास महापौर उषा ढोरे यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, नगरसेवक मोरेश्वर शेडगे, माहिती व जनसंपर्क विभागाचे रमेश भोसले आणि प्रफुल्ल पुराणिक आदी उपस्थित होते.

22 जून 1897 रोजी पुण्यातील गणेशखिंडीत दामोदर पंतांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रॅंड आणि आयर्स्टचा वध केला होता. इंग्रजांनी दामोदर पंतांना 18 एप्रिल 1898 रोजी पुण्यातील येरवडा तुरूंगात फाशी दिली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.