Pimpri: प्लाझ्मा दान करणाऱ्या रुग्णांना पालिकेने प्रोत्साहन रक्कम द्यावी, संदीप वाघेरे यांची मागणी

Pimpri: Municipal Corporation should give incentive amount to patients who donate plasma, demands Sandeep Waghere कोरोना रुग्ण बरा झाल्यावर त्यांना प्लाझ्मा दान करता येतो. प्लाझ्मा दान करण्याची प्रकिया ही रक्तदानापेक्षा वेगळी आहे.

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेने प्लाझ्मा थेरपी अवलंब करण्यासाठी बरे झालेल्या रुग्णांना प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन करावे. प्लाझ्मा दान करणार्‍यांना प्रोत्साहन भत्ता म्हणून दोन हजार रुपये देण्याचे राज्य सरकारच्या विचाराधीन आहे. त्याचधर्तीवर पालिकेनेही प्लाझ्मा दान करणार्‍यांना काही प्रोत्साहन रक्कम जाहीर करावी. त्यामुळे प्लाझ्मा दान करणारे पुढे येतील, अशी मागणी भाजप नगरसेवक संदीप वाघेरे यांनी केली आहे.

प्लाझ्मा मिळाल्यास अनेक कोरोनाबाधित रुग्णांना त्याची मोठी मदत होईल. त्यासाठी आयुक्त, महापौर यांनी कोरोनामुक्त रुग्णांना प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन करावे, असे सांगत नगरसेवक वाघेरे यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. दररोज शेकडोच्या संख्येतील वाढत्या रुग्णसंख्येमुळे शहरात भितीचे वातावरण असतानाच एक दिलासादायक बातमी पुढे आली आहे.

महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. विनायक पाटील यांच्या प्रयत्नांना यश आले असून ‘प्लाझ्मा थेरपी’चा वापर केल्याने 13 कोरोना रुग्ण ठणठणीत बरे होवून घरी गेले आहेत.

त्यामुळे प्लाझ्मा थेरपी ही रुग्णांना जीवनदान देण्यासाठी उपयुक्त आहे. तसेच राज्य सरकारकडून प्लाझ्मा दान करणार्‍यास प्रोत्साहन भत्ता म्हणून दोन हजार रुपये देण्याचा निर्णय विचाराधीन आहे.

पालिकेनेही या रकमेप्रमाणे महापालिकेकडून प्लाझ्मा दान करणार्‍यांना काही प्रोत्साहन रक्कम जाहीर करावी. त्यामुळे प्लाझ्मा दान करणारे पुढे येतील, असे वाघेरे यांनी इ-मेलद्वारे पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे.

पुणे शहरात प्लाझ्मा थेरपीच्या ट्रायलसाठी तीन रक्तपेढ्यांना इंडियन कौन्सिल ऑफ मेहिकल रिसर्च (आससीएमआर) कडून मान्यता देण्यात आली होती. तर, पिंपरी-चिंचवड शहरात वायसीएममधील रक्तपेढीला मान्यता देण्यात आली आहे.

_MPC_DIR_MPU_II

त्यानुसार प्लाझ्मा डोनर बँक तयार करण्यात आली आहे. निकषाची पुर्तता केल्यानंतर रक्तपेढयांना ही मान्यता मिळते. कोरोना रुग्ण बरा झाल्यावर त्यांना प्लाझ्मा दान करता येतो. प्लाझ्मा दान करण्याची प्रकिया ही रक्तदानापेक्षा वेगळी आहे.

कोरोना बाधित होवून बरा झालेल्या रुग्णाचे रक्त स्पेल सेपरेटर या मशिनमध्ये घेतले जाते. त्यातून 400 ते 500 मिली प्लाझ्मा वेगळा केला जातो. त्यानंतर उर्वरीत रक्त पुन्हा संबंधित प्लाझ्मा दात्याच्या शरीरात सोडण्यात येते.

ही प्रकिया रक्तपेढीतच होते. त्यासाठी 40 मिनिटे लागतात. परंतु, यासाठी प्लाझ्मा दात्याचा व रुग्णाचा रक्तगट जुळणे महत्वाचे असते.

वायसीएम व भोसरी आदी रुग्णालयांमध्येही कोरोना काळात धडाडीने काम केलेल्या डॉ. विनायक पाटील यांनी काही रुग्णांना प्रेरित केल्यामुळे 15 ते 20 कोरानातून बरे झालेल्या व्यक्तींनी आपला प्लाझ्मा वायसीएमच्या रक्तपेढीत दान केला.

त्यातील बहुतांश लोकांचा प्लाझ्मा जुळला व तो रुग्णांना दिल्यानंतर अवघ्या 24 ते 48 तासांत सुमारे 13 रुग्ण ठणठणीत बरे झाले आहेत. शहरात 15 जुलै 2020 पर्यंत कोरानातून बरे होवून घरी गेलेल्या रूग्णांची संख्या 5 हजार 235 आहे.

परंतु, प्लाझ्मा दान करणारे 15 ते 20 म्हणजे अत्यल्प आहेत. यासाठी जनजागृती करण्याची अत्यंत गरज आहे, अशी त्यांनी मागणी केली आहे.

तसेच, जे रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत त्यांची आपल्याकडे रुग्णालयात माहिती (डाटा) आहे. त्यानुसार त्यांना पत्र पाठवून व मेल तसेच व्हॉटसअ‍प द्वारे महापौर आपण व आयुक्तांच्या स्वाक्षरीनुसार प्लाझ्मा दानाचे आवाहन केल्यास मोठ्या प्रमाणात फरक पडून अनेक दाते पुढे येतील, असे पत्रात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.