Pimpri: महापालिकेने कलाकारांना आर्थिक मदत करावी – अमित गोरखे

एमपीसी न्यूज – कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी केलेल्या लॉकडाउनचा फटका कलारांनाही मोठ्या प्रमाणात बसला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील नृत्य कलाकार, गायन कलाकार, वादक यांच्यासमोर आर्थिक प्रश्‍न निर्माण झाले आहेत.

कार्यक्रम, रेकॉर्डिंग, शिकवणी असे सर्व स्त्रोत बंद झाल्याने शास्त्रीय नृत्य सादर करणारे साथ-संगत करणारे सहकलाकारांचे उत्पन्न थांबले आहे. त्यामुळे कलाकारांना महापालिकेने आर्थिक मदत करावी, अशी मागणी कलारंग संस्थेचे अमित गोरखे यांनी केली आहे.

याबाबत गोरखे यांनी महापौर उषा ढोरे, आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने सांस्कृतिक धोरणांतर्गत अनेक संस्कृतीक उपक्रम राबविले जातात.

हे उपक्रम राबवताना शहरातील स्थानिक  कलाकारांना  वेळोवेळी संधी दिली आहे. परंतु,  कोविड- 19 च्या पार्श्वभूमीवर या सर्व कलाकारांना महापालिकेच्या वतीने मदतीचे धोरण अवलंबून त्यांना मदत करणे गरजेचे आहे.

शहरात नृत्य कलाकार, गायन कलाकार, वादक यांच्यासमोर आर्थिक प्रश्‍न निर्माण झाले आहेत. कार्यक्रम, रेकॉर्डिंग, शिकवणी असे सर्व स्त्रोत बंद झाल्याने शास्त्रीय नृत्य सादर करणारे साथ-संगत करणारे सहकलाकार यांचे उत्पन्न थांबले आहे.

केवळ कलेवरील उत्पन्नावर अवलंबून असणाऱ्या कलाकारांसमोर पुढील सहा ते आठ महिने कसे काढायचे हा प्रश्न आहे. कार्यक्रमास लागणारे प्रकाश योजनाकार, ध्वनी योजनाकार, मेकअप आर्टिस्ट पडद्यामागील कलाकार आधी सर्वच अडचणीत आहेत.

त्यामुळे महापालिकेने कला-क्रीडा सांस्कृतिक धोरणा अंतर्गत आपली जबाबदारी म्हणून या सर्व कलाकारांना आर्थिक अथवा इतर पद्धतीने मदत करावी, अशी विनंती गोरखे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.