Pimpri: लॉकडाऊन काळात अंत्यविधीचे साहित्य महापालिकेने मोफत उपलब्ध करावे – सीमा सावळे

एमपीसी न्यूज – कोरोना व्हायरसचे संक्रमण रोखण्यासाठी 21 दिवसांचे लॉकडाऊन सुरु असल्याने नागरिक कुटुंबासहीत घरातच आहेत. यामुळे हतावर पोट असणाऱ्या अनेक नागरिकांना उपजिविका भागविणे देखील अवघड झाले आहे. अशा परिस्थितीत नैसर्गीक  मृत्यू झालेल्या नातेवाईकांचे अंत्यविधी करण्यासाठी पैसे उपलब्ध करणे गोरगरीबांना शक्य होत नाही.  त्यामुळे महापालिकेच्या वतीने लॉकडाऊन काळात  अंत्यविधीचे साहित्य सर्व स्मशानभूमीत मोफत उपलब्ध करावे, अशी मागणी  नगरसेविका सीमा सावळे यांनी केली आहे.

याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात सावळे यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड  कामगारांचे शहर असल्याने शहरात हातावर पोट असणऱ्यांची संख्या खुप मोठी आहे. लॉकडाऊन असल्यामुळे नागरिकांना घरातच राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोरोनाचे संकट अचानक विश्वासमोर अल्याने सर्व कामकाज ठप्प झाले आहे.

गोरगरिबांसह अनेक मध्यमवर्गीय कुटुंबांना मोठा आर्थिक फटका सोसावा लागत आहे. अशा परिस्थितीत कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा नैसर्गीक मृत्यू झाल्यास अंत्यविधीसाठी लागणारा खर्च करण्यासाठी घरात पैसेच नाहीत, अशी परिस्थिती अनेक ठिकाणी निर्माण झाली आहे. लॉकडाऊन काळात अंत्यविधी साहित्य महापालिकेने मोफत उपलब्ध केल्यास नागरिकांना मदत होईल. कष्टकऱ्यांच्या संकटाच्या या परिस्थितीत ज्यांना शक्य आहे. त्यांनी यथा शक्ती मदत करावी, असे आवाहन नगरसेविका सावळे यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.