Pimpri: महापालिकेने घेतली 20 रुपयांना पाण्याची बाटली, 10 रुपयांना बिस्कीट पुडा; 8 लाखांच्या खर्चास मान्यता

Municipal Corporation purchased Mineral Water Bottle for Rs 20, Biscuit biscuit packet for Rs 10; Approval at a cost of Rs 8 lakh

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका रूग्णालयात उपचार घेणाऱ्या कोरोना बाधीत रूग्णांसह डॉक्टर आणि इतर कर्मचा-यांना गेल्या तीन महिन्यापासून पाणी बॉटल, बिस्कीटचा एक पुडा अशी सुविधा पुरविण्यात आली आहे. त्यासाठी आठ लाख रूपये खर्च झाला आहे. पाण्याची एक बाटली 20 रुपये तर बिस्कीटाचा एक पुडा 10 रुपये दराने महापालिकेने खरेदी केला आहे. पाणी बॉटल आणि बिस्कीट पुरविण्यावर आठ लाख रूपये खर्च झाला आहे. या खर्चास स्थायी समितीने आज (बुधवारी) मान्यता दिली.

शहरात कोरोनाचा कहर सुरू आहे. शहरातील कोरोना बाधीत रूग्णांची संख्या विचारात घेता शहरात भविष्यात रूग्णांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.

कोरोनाबाधीत अथवा संशयित रूग्णांना विलगीकरण कक्षात ठेवणे गरजेचे असते. कोरोना रूग्णांवर महापालिकेच्या वायसीएम रूग्णालय, भोसरी रूग्णालय तसेच बालेवाडी क्रीडा संकुलातील विलगीकरण कक्षात उपचार केले जातात.

_MPC_DIR_MPU_II

पिंपरी येथील नवीन जिजामाता रूग्णालय तसेच इतर ठिकाणीही हे कक्ष तयार करण्याची कार्यवाही सुरू आहे. या कक्षातील रूग्ण, अधिकारी, कर्मचारी यांना सकाळचा नाश्ता, दोन वेळचा चहा आणि दोन वेळचे जेवण हा आहार उपलब्ध करून दिला जातो.

नवीन भोसरी रूग्णालयातील ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी यांनी या आहाराबरोबरच रूग्णांना पाण्याच्या दोन ते तीन बॉटल, बिस्कीटचा एक पुडा देण्याबाबत 25 जून रोजीच्या पत्राद्वारे मागणी केली होती. त्यानुसार त्यांना 13 जूनपर्यंत ही सुविधा पुरविण्यात आली.

वायसीएम रूग्णालयातील क्वालिटी केटरर्स यांच्यामार्फत एका पाणी बॉटलसाठी 20 रूपये आणि एका बिस्कीट पुड्यासाठी 10 रूपये या दराने ही सुविधा देण्यात आली. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी हे दरही स्वीकृत केले. त्यानुसार, पाणी बॉटल आणि बिस्कीट पुरविण्यावर आठ लाख रूपये खर्च झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1