Pimpri: महापालिकेच्या अतिक्रमण निरीक्षकाला शिवीगाळ करत मारहाण; अतिक्रमण वाहनाची तोडफोड

Pimpri Municipal Encroachment Inspector beaten up फिर्यादी लांडगे हे पिंपरी-चिंचवड महापालिकेत अतिक्रमण विभागात निरीक्षक पदावर कार्यरत आहेत.

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अतिक्रमण निरीक्षकाला चार जणांनी मिळून शिवीगाळ करत वजन काट्याने मारहाण केली. तसेच अतिक्रमण वाहन अडवून त्याची तोडफोड केली. ही घटना गुरुवारी (दि.23) दुपारी पावणे एकच्या सुमारास नेहरूनगर येथे घडली.

राजू अश्रुबा वाघमारे (वय 41), शुभम राजू वाघमारे (वय 19), सुभाष राजू वाघमारे (वय 20) यांच्यासह एका अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अतिक्रमण निरीक्षक सतीश निवृत्ती लांडगे (वय 54) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी लांडगे हे पिंपरी-चिंचवड महापालिकेत अतिक्रमण विभागात निरीक्षक पदावर कार्यरत आहेत.

गुरुवारी दुपारी पावणेएकच्या सुमारास ते अतिक्रमण विभागाच्या पथकासोबत नेहरूनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडीयम येथे काम करत होते. त्यावेळी आरोपी तिथे आले. त्यांनी लांडगे यांना पकडून शिवीगाळ करत लाकडी दांडके आणि वजन काट्याने मारहाण केली.

आरोपींनी अतिक्रमण विभागाचे वाहन अडवून त्याची तोडफोड करून लांडगे यांना धमकी दिली. याबाबत आरोपींवर भारतीय दंड विधान कलम 353, 332, 504, 506, 427, 341, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.