BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri: कोजागिरी पोर्णिमेसाठी महापालिकेची उद्याने रात्री 12 वाजेपर्यंत खुली राहणार

एमपीसी न्यूज – कोजागिरी पोर्णिमेचा नागरिकांना आनंद घेता यावा, यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेची 45 सार्वजनिक उद्याने येत्या (रविवारी) रात्री बारा वाजेपर्यंत खुली राहणार आहेत. त्यामुळे नागरिकाना कुटुंबीयांसोबत उद्यानात कोजागरी साजरी करता येणार आहे.

पावसाळा संपल्यानंतर कोजागिरी ही पहिली पोर्णिमा येते. आकाशात काळ्या कुट्ट ढगाळ वातावरणाचे साम्राज्य संपल्यानंतर कोजागिरी पौर्णिमेला येणारी चंद्राची किरणे मनाला सुखावतात. त्यामुळेच या आल्हाददायक वातावरणाचा आनंद घेण्यासाठी दस-यानंतर कोजागिरी साजरी करतात. रविवारी कोजागिरी पोर्णिमा आहे.

शहरातील नागरिकांना कोजागिरी पोर्णिमा साजरी करण्यासाठी दरवर्षी महापालिकेची उद्याने रात्री उशिरापर्यंत खुली ठेवली जातात. महापालिकेची शहरातील 45 उद्याने नागरिकांना रविवारी कोजागिरी पोर्णिमेचा आनंद घेता यावा यासाठी रात्री बारा वाजेपर्यंत खुली ठेवण्यात येणार आहेत, अशी माहिती उद्यान विभागाने दिली.

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like