Pimpri: महापालिकेतील आरोग्य निरीक्षकांचा ‘ड्रेसकोड’ चेंज!

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील आरोग्य निरीक्षक आणि मुख्य आरोग्य निरीक्षक यांच्या ’ड्रेसकोड’मध्ये बदल करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. पूर्वी देण्यात येत असलेल्या खाकी रंगाच्या पँटसोबत निळ्या रंगाच्या शर्टऐवजी आता खाकी रंगाचाच शर्ट देण्यात येणार आहे. इतकेच नव्हे, तर त्यांच्या डोक्यावर महापालिकेच्या मोनोग्रामसह खाकी रंगाची टोपी देखील दिली जाणार आहे.

महापालिकेच्या आस्थापनावर असणा-या आरोग्य निरीक्षक आणि मुख्य आरोग्य निरीक्षक यांना गणवेश दिले जातात. त्यामध्ये दोन नग खाकी टेरिकोट फुल पँट, ज्याच्या दोन्ही बाजूला आणि दोन मागे खिसे, तीन मोठे लुक्स असतात. त्याप्रमाणे दोन खिसे कव्हरसह, पीसीएमसी मोनोग्राम, खिशावर पदनाम व नेमप्लेट, खांद्यावर प्लॅक्स असलेले दोन निळ्या रंगाचे टेरिकोटचे पुâल बाही बुश शर्ट, दर दोन वर्षांनी दोन इंची लाल रंगाचा एक कुरून लेदरचा कमरपट्टा, एक जोड लाल रंगाचे लेसचे लेदर बुट, पांढ-या रंगाचे दोल जोडे नायलॉनचे पायमोजे दिले जातात.

त्याबरोबर दर दोन वर्षांनी टोपीसह रेनकोट, फुलसाईज गमबूट हे पावसाळी साहित्याचा समावेश आहे. या ’ड्रेसकोड’मध्ये महापालिकेतर्फे बदल करण्यात आला आहे. खाकी रंगाच्या पँटसोबत आता निळ्या रंगाचा शर्ट असणार नाही. तर, खाकी रंगाचा टेरिकोटचाच शर्ट दिला जाणार आहे. त्याचप्रमाणे महापालिकेच्या मोनोग्रामसह खाकी रंगाची टोपी देखील दिली जाणार आहे.

याव्यतिरिक्त आरोग्य निरीक्षक आणि मुख्य आरोग्य निरीक्षक यांच्या गणवेशामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पावसाळी साहित्य व कमरपट्टा दर दोन वर्षांनी दिले जाणार आहे. नुकत्याच झालेल्या महापालिका सर्वसाधारण सभेत त्याला मान्यता देण्यात आली आहे.

HB_POST_END_FTR-A2
You might also like