Pimpri : महापालिकेची प्लॅस्टिक बाळगणाऱ्या दुकानांवर कारवाई; एकूण 11,000 रुपये दंड वसूल

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड शहरात महानगरपालिकेकडून प्लॅस्टिक बाळगणाऱ्या दुकानांवर कारवाई करण्यात आली आहे.  ही कारवाई पिंपरी कॅम्प ते जमतानी चौक वार्ड क्रमांक 21 येथील 25 दुकानांची तपासणी केली असता दोन दुकानदारांकडे 15 किलो 816 ग्रॅम वजनाच्या प्लॅस्टिक पिशव्या आढळून आले. त्यामुळे त्यांना महानगरपालिकेच्या शासकीय नियमानुसार त्यांच्याकडून प्रत्येकी 5000 रुपये दंड करण्यात आला. तर, एका दुकानदाराने कचरापेटी न ठेवल्याने त्यांना 1000 रुपये दंड करण्यात आला,  असा एकूण 11000 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

ही सर्व कारवाई मुख्य आरोग्य निरीक्षक राजू बेद, आरोग्य निरीक्षक एस. बी. चन्नाल, कर्मचारी विकास शिंदे, दाजी करवंदे, शरद दराडे, विनायक बोऱ्हाडे,शैलेश भोसले, इन्सान काळे, श्याम कोटीयाना, सूर्यकांत हुंबरे, प्रल्हाद शिंदे, विनायक सौधे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.