Pimpri: महापालिका व्यावसायिक अनधिकृत नळजोड शोधणार; आयुक्त श्रावण हर्डीकर यांची माहिती

एमपीसी न्यूज – शहरातील व्यावसायिक अनधिकृत नळजोड शोधण्याची मोहिम राबविण्यात येणार आहे. एका महिन्याच्या आतमध्ये त्याची तपासणी केली जाणार आहे. त्यामध्ये हॉटेल, कार वॉशिंग सेंटर, बांधकाम व्यावसायिक यांचा शोध घेण्यात येईल. महापालिकेच्या नळयोजनेतून पाणी घेत असल्यास कारवाई केली जाणार आहे. महापालिकेच्या नळजोडातून पाणी घेणा-या खासगी टँकरवर फौजदारी गुन्हे दाखल केले जाणार आहेत, अशी माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली.

सोमवार (दि.25) पासून एकदिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्याची माहिती देताना आयुक्त हर्डीकर म्हणाले, 40 टक्के नळ कनेक्शन 135 लीटरपेक्षा अतिरिक्त पाण्याचा वापर करतात. तो अन्यायकारक आहे. काही भागात 50 लीटरच पाणी मिळते. त्यासाठी पाण्याचा वापर कमी करावा म्हणून नागरिकांमध्ये जनजागृती, पाण्याची उपलब्धता वाढविणे आवश्यक आहे.

अनधिकृत नळजोड सापडल्यास जागेवरच अधिकृत केले जाणार आहेत. जे नागरिक अनाधिकृत नळजोड स्वत:हून नियमित करणार नाहीत. त्यांचे नळजोड चोवीस बाय सात, अमृत योजनेअंतर्गत वितरण नलिकेस जोडण्यात येणार आहेत. पाणीबील प्रणालीत घेण्यात येईल. त्यांचे नावे अनामत रक्कम, दंड, विलंब शुल्काची रक्कम पाच हप्त्यांमध्ये टाकण्यात येऊन पाणीबील देण्यात येईल.

ऐकापेक्षा जास्त नळजोड असल्यास ते तोडून त्यांच्याकडून दंडाची वसूल करण्यात येणार आहे. चोवीस तास योजनेचे काम पुर्ण होत नाही. तोपर्यंत असमान पाणीपुरवठा राहील. जेएनयूआरएम, अमृत अंतर्गत सुरु असलेले काम पुर्ण होण्यास एक वर्षाचा कालावधी लागणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.