Pimpri : पूर्ववैमनस्यातून एकावर खुनी हल्ला, तीन अनोळखी हल्लेखोरांवर गुन्हे दाखल

Pimpri: Murderous attack on one of the premeditated, three unidentified assailants charged

एमपीसी न्यूज – जुन्या भांडणाच्या कारणावरून तीन जणांनी मिळून एकाला मारहाण केली. तर एकावर खुनी हल्ला करून गंभीर जखमी केले. ही घटना सोमवारी (दि. 1) रात्री साडेसातच्या सुमारास आनंद धाम स्मशानभूमी चिंचवड आणि लालटोपी नगर मोरवाडी येथील प्रवेशद्वारावर घडली.

राजू गोपाळ जानराव असे खुनी हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. तर रफिक अमीन मनेर (वय 45, रा. पिंपरी गाव, पिंपरी) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. मनेर यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी तीन अनोळखी इसमांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री सव्वासात ते साडेसात वाजण्याच्या सुमारास आनंद धाम स्मशानभूमी चिंचवड आणि लालटोपी नगर मोरवाडी येथील प्रवेशद्वारावर तीन अनोळखी इसमांनी फिर्यादी आणि राजू जानराव यांच्यावर जुन्या भांडणाच्या कारणावरून हल्ला केला.

फिर्यादी मनेर यांना लाकडी फळीने डाव्या हातावर मारले. यात ते जखमी झाले. तर राजू जानराव यांना डोक्यात आणि पाठीवर लाकडी फळीने मारून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.