Pimple Nilakh: मुरलीधर साठे यांचे निधन

एमपीसी न्यूज – पिंपळे निलख मधील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मुरलीधर नारायण साठे (वय 78) यांचे गुरुवारी (दि. 20) ह्रदयविकाराने निधन झाले. त्यांच्या मागे, पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सूना, जावई, नातू, पणतू असा परिवार आहे. पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांचे ते वडील होत.

मुरलीधर साठे हे पिंपळे निलख उत्सव कमिटीचे अनेक वर्षे अध्यक्ष होते आणि छत्रपती शिवाजी मंडळाचे ते संस्थापक अध्यक्ष होते.

मुरलीधर साठे यांच्या पार्थिवावर आज, शुक्रवारी सकाळी 9 वाजता पिंपळे निलख मधील दादा साठे घाट स्मशानभूमी, मुळा नदीकिनारी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.