Pimpri : पिंपरी विधानसभेत हिंदू-मुस्लिम बांधवांनी शिवबंधन बांधून केला शिवसेनेत प्रवेश

एमपीसी न्यूज – आगामी लोकसभेच्या धर्तीवर शिवसेनेत अनेक कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश घडवून आणला जात आहे. आज शनिवार (दि. ६) रोजी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शिवसेनेचे युवराज दाखले यांच्या पुढाकाराने पिंपरी विधानसभेत जमीर शेख यांच्यासह अनेक हिंदू-मुस्लिम बांधवांनी शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला.

मावळ लोकसभेवरती भगवा झेंडा फडकविणारच, असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला. त्यासाठी सज्ज रहा, असे मुस्लिम बांधवांकडुन वचन घेतले.
यावेळी शिवशाही व्यापारीसंघ प्रदेश अध्यक्ष युवराज दाखले, प्रदेश सचिव गणेश आहेर, निलेश भोरे, मारूती मस्के, गोरख पाटील, माऊली जाधव आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.