Pimpri: आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराने एन. डी. पवार सन्मानित

एमपीसी न्यूज – कोल्हापूर येथील जनकल्याण सामाजिक सेवा संस्थेच्या वतीने दारूंब्रे येथील पंचक्रोशी विद्यालयाचे मुख्याध्यापक एन. डी. पवार यांचा राज्यस्तरीय ‘आदर्श मुख्याध्यापक’ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

  • कोल्हापूर येथे नुकत्याच झालेल्या या सोहळ्यामध्ये इंदोरीचे माजी सरपंच संदीप काशीद यांना ‘आदर्श सरपंच’ तर पत्रकार बी. एम. भसे यांना ‘आदर्श पत्रकार’ म्हणून सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी भगवान महाराज कोकरे, माजी आमदार संपतराव पवार-पाटील, संस्थेचे अध्यक्ष उदयसिंह पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. राज्याच्या विविध भागात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या 30 मान्यवरांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.

जनकल्याण संस्था ही महिला, कामगार, अनाथ, दिव्यांग, कुष्ठरोगी अशा समाजातील वंचित घटकासाठी पुढाकार घेऊन त्यांना मदत करत असते. तसेच पर्यावरण रक्षण, व्यसनमुक्ती जनजागृतीसाठी संस्था कार्य करत असल्याचे संस्थेचे अध्यक्ष उदयसिंह पाटील यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.