Pimpri: महापालिका कर्मचा-यांमुळे शहराचा ‘बेस्ट सिटी’ म्हणून नावलौकिक – महापौर जाधव

एमपीसी न्यूज – सेवानिवृत्त होणा-या कर्मचा-यांनी महापालिका सेवेच्या माध्यमातून शहराची सेवा केली आहे. त्यामुळे आज पिंपरी-चिंचवड शहर बेस्ट सिटी म्हणून नावलौकिकास येण्यास मदत झाली, असे मत महापौर राहुल जाधव यांनी व्यक्त केले. महानगरपालिका सेवेतून माहे मे 2019 अखेर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणा-या तसेच स्वेच्छा निवृत्ती घेतलेल्या 75 अधिकारी आणि कर्मचा-यांचा सत्कार महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते पुस्तक, स्मृतीचिन्ह, सेवा उपदान आणि अंशराशीकृत धनादेश सुपूर्द करुन सन्मान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

ऑटो क्लस्टर येथे झालेल्या या कार्यक्रमास स्थायी समिती सभापती विलास मडीगेरी, विरोधी पक्षनेते दत्तात्रय साने, मनसे गटनेते सचिन चिखले, नगरसदस्य मोरेश्वर भोंडवे, नगरसदस्या अनुराधा गोरखे, सहाय्यक आयुक्त आशादेवी दुरगुडे, अण्णा बोदडे, कार्यकारी अभियंता रामदास तांबे, प्रविण लडकत, कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप, कर्मचारी महासंघाच्या चारुशिला जोशी, मनोज माछरे आदी उपस्थित होते.

  • यावेळी नगरसदस्या अनुराधा गोरखे म्हणाल्या, सेवानिवृत्त होणा-या कर्मचा-यांनी उद्यापासून आपले दिनक्रम निश्चित करून वेळ चांगल्या कामांसाठी द्यावा. तसेच इथून पुढचे आयुष्य स्वतःसाठी जगावे. नोकरीमुळे राहून गेलेल्या आपल्या आवडी निवडी पुन्हा नव्याने जोपासाव्या तसेच आनंदी जीवन जगावे.

महापालिका सेवेतून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्यांमध्ये अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, प्रशासन अधिकारी प्रदीपकुमार मुथा, राजीव जाधववार, राजेश जगताप, उपअभियंता अंकुश कोंडे, सहा.आरोग्याधिकारी प्रभाकर तावरे, मुख्यध्यापक विनय उपासनी, नामदेव उतळे, भरत मिरगणे, अनिता काटे, उपशिक्षिका पुष्पा वैद्य, लेखापाल प्रकाश भारंबे, उपलेखापाल गौतम नागटिळक, रमेश शिंदे, बबन कुंभार, कनिष्ठ अभियंता सुदाम कु-हाडे, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक रफिकअहमद हुसेनसाहेब करजगी, उद्यान सहाय्यक हनुमंत म्हेत्रे, आरोग्य सहाय्यक साहेबराव मोरे, प्रकश भोंडवे, कार्यालयीन अधिक्षक महेंद्र गुजराथी, मुख्य लिपिक संदीप भुजबळ, वेरोनीका देशमाने, विनायक महाजन, मच्छिंद्र पवार, सहा.भांडारपाल विकास राऊत, वाहनचालक राजेंद्र रावखंडे, नानासाहेब वाघ, राजकुमार जाधव, अरुण मोरे, माणिकराव माने, धनु काची, बाळासाहेब औटी, दिनकर आव्हाड, मुरलीधर दुश्मन, इले.मोटार पंप ऑपरेटर भानुदास राऊत, लिडिंग फायरमन भगवान यमगर, फिटर जयंत पारखे, गाळणी ऑपरेटर सुरेश कदम, मिटर निरीक्षक मधुकर रणपिसे, प्रकाश जगदाळे, प्लंबर दत्तात्रय खोपडे, वीजतंत्री उत्तम जगताप, वायरमन रामहरी कस्पटे, राजेंद्र काळे, विलास फुगे, रेडीओ मेक.इले. नागनाथ कांबळे, लिफ्टमन सुभाष चोपडे, सुरक्षा सुपरवायजर पांडुरंग शिवले, रखवालदार राम तेलंगी, सुरेश जाधव, महादेव वाघोले, सुधाकर इंदलकर, काशिनाथ कुसळे, मुकादम सिद्दन्णा हलसंगी, रमेश कोष्टी, पार्वती कल्हापुरे, शिपाई अशोक वाघमारे, शरद भोंडवे, मजूर नंदकुमार मोरे, विलास क्षिरसागर, कोंडीराम ननावरे, देवराम येवले, बशीर शेख, विलास लांडगे, सफाई कर्मचारी कमल दुबळे, सुजाता गायकवाड, शकुंतला आसुगडे, सफाई सेवक मुन्नीबाई चन्नाल आदींचा समावेश आहे तर स्वेच्छानिवृत्त होणा-यांमध्ये मुकादम जयप्रकाश बोह्त, सफाई कामगार संगीता लोंढे, आशा लांडगे, सफाई सेवक शारदा निंदाणी, प्रगती डोळस, कचरा कुली शंकर पवार आदींचा समावेश आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.