Pimpri: कोविड टेस्टिंग लॅबला दत्ताकाका साने यांचे नाव द्या – तुषार कामठे

Name the Covid Testing Lab as 'Datta Sane' - Tushar Kamthe कोविड टेस्टिंग लॅबला स्वर्गीय दत्ताकाका साने यांचे नाव द्यावे अशी मागणी भाजप नगरसेवक तुषार कामठे

एमपीसी न्यूज – पिंपरी पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते व  दिवंगत नगरसेवक दत्ता साने यांचे शहराच्या जडणघडणीत, विकासात अमुल्य योगदान आहे. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले. दत्ताकाकांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. पालिकेच्या वायसीएम आणि भोसरी रुग्णालयातील कोविड टेस्टिंग लॅबला स्वर्गीय दत्ताकाका साने यांचे नाव द्यावे अशी मागणी भाजप नगरसेवक तुषार कामठे यांनी केली आहे.

याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना पत्र मेल पाठविले आहे. त्यात नगरसेवक कामठे यांनी म्हटले आहे की, शहरातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी कोरोना संशयितांच्या तपासणीसाठी वायसीएम आणि भोसरी रुग्णालयात कोविड टेस्टिंग लॅब सुरु करण्यात आली आहे.

माजी विरोधी पक्षनेते व दिवंगत नगरसेवक दत्ताकाका साने यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. स्वर्गीय दत्ताकाका साने यांचे शहराच्या जडणघडणीत, विकासात अमुल्य योगदान आहे. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले. शहरातील गोरगरीबांना मोफत व चांगली आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी. यासाठी दत्ताकाका कायम आग्रही असायचे. पालिकेच्या वायसीएम आणि भोसरी रुग्णालयात कोविड टेस्टिंग लॅबला काकांचे नाव देऊन त्यांना श्रद्धांजली वाहण्यात यावी.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.