Pimpri: पुणे मेट्रोचे ‘पुणे, पिंपरी-चिंचवड महामेट्रो’ असे नामकरण करा’; राष्ट्रवादीचे नगरसेवक मयूर कलाटे यांची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी

एमपीसी न्यूज – पुणे महामेट्रोचे ‘पुणे, पिंपरी-चिंचवड महामेट्रो’ असे नामकरण करण्याची मागणी राष्ट्रवादीचे नगरसेवक मयूर कलाटे यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.

पुणे व पिंपरी-चिंचवड शहरांमध्ये मेट्रोचे काम प्रगतीपथावर आहे. येत्या वर्षभरात पिंपरी ते शिवाजीनगर, स्वारगेटपर्यंत मेट्रो चालू होईल. या मेट्रोचे नामकरण पुणे महामेट्रो असे करण्यात आले आहे. परंतु, पिंपरी-चिंचवड शहरामधून शिवाजीनगर, स्वारगेट येथे मेट्रो जाणार आहे. पिंपरी-चिंचवड शहराने औद्योगिकरण, आयटी क्षेत्रात सर्वात वेगाने विकसित होणा-या शहरांमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातून जाणा-या मेट्रोचे पुणे महामेट्रो असे न करता पुणे – पिंपरी-चिंचवड महामेट्रो असे नामकरण करणे क्रमप्राप्त आहे. पिंपरी-चिंचवड शहरवासीयांच्या आत्मसन्मानाचा हा प्रश्न आहे. त्यामुळे मेट्रोचे पुणे-पिंपरी -चिंचवड महामेट्रो असे नामकरण करण्यात यावे, अशी मागणी कलाटे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.