Pimpri: महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदाचा नाना काटे यांनी स्वीकारला पदभार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विरोधी पक्षनेते पदाचा पदभार नाना काटे यांनी आज (गुरुवारी) स्वीकारला आहे. विरोधाला विरोध करणार नाही. चुकीच्या कामांना प्रखर विरोध करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

महापौर राहुल जाधव यांनी काटे यांना विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्याचे पत्र दिले. यावेळी मावळते विरोधी पक्षनेते दत्ता साने, माजी महापौर मंगला कदम, नगरसेविक वैशाली काळभोर, माई काटे, सुलक्षणा धर, निकिता कदम, नगरसेवक राजू मिसाळ, जावेद शेख उपस्थित होते.
  • यावेळी नाना काटे म्हणाले, शहरातील नागरिकांना हिताच्या प्रश्नासाठी  सभागृहात आवाज उठविला जाईल.  शास्तीकर, कचरा, आरोग्य, भ्रष्टाचार, अनधिकृत बांधकामे व इतर प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण सत्ताधाऱ्यांना भाग पाडू व सभागृहात याबद्दल आवाज उठविला जाईल.  विरोधाला विरोध करणार नाही. चुकीच्या कामांना राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रखर विरोध असेल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.