Pimpri : शहरातून राष्ट्रीय खेळाडू निर्माण झाले पाहिजेत – आमदार महेश लांडगे

एमपीसी न्यूज – राष्ट्रीय खेळाडू कै.पै.मारुती (नाना) सहादू कंद यांनी कब्बडी या खेळात पिंपरी चिंचवड शहराचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर नेले आहे. त्यामुळे त्यांच्या स्मृती जतन करुन जास्तीत जास्त राष्ट्रीय खेळाडू या शहरातून निर्माण होतील असे मत आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने प्रभाग क्र. ८ इंद्रायणीनगरमध्ये नव्याने विकसित केलेल्या स्केटिंग रिंक ग्राउंडचे राष्ट्रीय खेळाडू कै.पै.मारुती (नाना) सहादू कंद असे नामकरण आणि त्याचे उदघाटन आमदार महेश लांडगे यांचे हस्ते झाले.त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी अध्यक्षस्थानी प्रभाग अध्यक्षा नम्रता लोंढे, ई प्रभाग अध्यक्षा भिमाबाई फुगे, शिक्षण समिती सभापती सोनाली गव्हाणे, माजी महापौर नितीन काळजे, नगरसदस्य नितीन लांडगे, राजेंद्र लांडगे, रवि लांडगे,विकास डोळस, लक्ष्मण उंडे,स्विकृतसदस्य विजय लांडे, गोपीचंद धावडे, माजी नगरसेवक दत्ताकाका लांडे, अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, शहर अभियंता आंबादास चव्हाण, कार्यकारी अभियंता संजय घुबे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, सामाजिक कार्यकर्ते सचिन लांडगे, कार्तिक लांडगे, आकाश कंद, विजय फुगे, गणेश फुगे, अविनाश शिंदे, समीर ढगे, नितीन धोत्रे, मारुती लांडगे, भगवान जाधव, विकास यादव, सुनिल गुजर, माधव धावडे, युवराज लांडगे, संभाजी फुगे, पांडुरंग धावडे, रामदास मेदनगर, महेंद्र मेदनकर, माहिती व जनसंपर्क विभागाचे रमेश भोसले, आदी उपस्थित होते.

राष्ट्रीय खेळाडू कै.पै.मारुती (नाना) सहादू कंद स्केटिंग रिंक ग्राउंड हे २.४७ एकर जागेत तयार केले आहे. पिंपरी चिंचवड मधील एकमेव रिंक आहे. २०० मी.परिघाचे स्केटिंग रिंक नवोदित खेळाडूंसाठी, १०० मी. सराव रिंक, त्यासाठीचे कोटींग परिसराला सिमा भिंत, वाहनतळ स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची, इ.सोयीसुविधासह कामे पुर्ण करण्यात आलेली आहेत. या कामी एकूण २ कोटी २७ लाख खर्च आलेला आहे. हे ग्राउंड शहरातील खेळाडूंना वरदानच ठरणार आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आकाश कंद यांनी केले तर सूत्रसंचालन माहिती व जनसंपर्क विभागाचे रमेश भोसले यांनी केले. आभार क प्रभाग अध्यक्षा नम्रता लोंढे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.