Pimpri : राष्ट्रीय मानांकन क्रमवारी ‘डीवाय पाटील दंत महाविद्यालय’ देशात तिसरे, राज्यात प्रथम

National Rankings DY Patil Dental College is third in the country and first in the state

एमपीसी न्यूज- केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्रालयांच्या वतीने भारतीय शैक्षणिक संस्था तसेच विद्यापीठांचे NIRF मूल्यमापन करण्यात आले. देशपातळीवर करण्यात आलेल्या या मूल्यमापनात पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील दंत महाविद्यालयाने देशात तृतीय, तर महाराष्ट्रात प्रथम स्थान पटकावले आहे.

NIRF श्रेणीमध्ये पहिल्यांदाच दंत शाखेचा सामावेश करण्यात आला होता. ‘वैद्यकीय श्रेणीत‌’ डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयास 24 वे स्थान प्राप्त झालेे आहे.

तसेच डॉ. डी. वाय. पाटील युनिटेक सोसायटी अंतर्गत डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फर्मास्युटिकल्स सायन्स अँड रिसर्च महाविद्यालयाला 41 वे स्थान प्राप्त झालेे आहे.

तसेच डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेकनॉलॉजी महाविद्यालयास 196 वे स्थान प्राप्त झाले. देशभरातील विद्यापीठ श्रेणीत डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ (DPU) पिंपरी ला 46 वा क्रमांक मिळाला आहे.

भारतातील एकूण 5000 पेक्षा जास्त शैक्षणिक संस्थांचे एनआईआरएफ मार्फत मूल्यमापन करण्यात आले होते.

दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यावर आमचा अधिक भर आहे. प्राध्यापक व विद्यार्थी यांनी शिक्षणाप्रती घेतलेल्या या परिश्रमामुळे आज हे यश प्राप्त झाले, याचा आम्हाला अभिमान वाटतो.

विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक व आधुनिक युगात सक्षम करणे हाच आमचा हेतू आहे, असे मत डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांनी व्यक्त केले आहे.

या यशाबद्दल डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, कुलगुरू डॉ. एन. जे. पवार, विद्यापीठ सोसायटीच्या उपाध्यक्षा डॉ. भाग्यश्रीताई पाटील, सचिव डॉ. सोमनाथ पाटील, विश्वस्त डॉ. स्मिता जाधव, ट्रस्टी व कोषाध्यक्ष डॉ. यशराज पाटील यांनी प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी यांचे कौतुक व अभिनंदन केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.