BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri: वादग्रस्त धर्मगुरुची भेट घेतल्याने राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार ट्रोल

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – अडखळत केलेले पहिले भाषण, लोकलने उलट्या दिशेने केलेला प्रवास, विनाकारण पळापळ आणि मावळमधून निवडणूक का लढवत आहात ? या प्रश्नाला दिलेले अजब उत्तर. यावरून अगोदरच ट्रोल झालेले मावळ लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार पुन्हा एकदा टीकाकारांच्या नजरेस आले आहेत. दापोडीतील विनियार्ड चर्चेचे वादग्रस्त फादर पास्टर डेव्हिड सिल्व्हे आणि जयश्री सिल्व्हे यांची शनिवारी (30) भेट घेतल्याने पुन्हा पार्थ ट्रोल होऊ लागले आहेत.

दापोडीतील विनियार्ड चर्चेमध्ये शनिवारी (30) सायंकाळी सात वाजता पार्थ पवार प्रचारासाठी पोहोचले होते. त्यांच्यासोबत शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी आमदार अण्णा बनसोडे, नगरसेवक रोहित काटे, नगरसेविका माई काटे, स्थायी समितीचे माजी सभापती अतुल शितोळे उपस्थित होते.

‘तुझी शक्ती माझ्यात आणि माझी शक्ती तुझ्यात ‘ असे आशीर्वाद दिले. दरम्यान, असाध्य रोगांवर उपचार करत असल्याचा फादर पास्टर डेव्हिड सिल्व्हे दावा करतात. त्यामुळे ते वादग्रस्त ठरले होते. त्यामुळे हिंदुत्ववादी संघटनाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर हल्ला केला होता. याप्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली होती. अंधश्रद्धा पसरवणाऱ्या धर्मगुरुची भेट घेतल्याने पार्थ पुन्हा एकदा ट्रोल झाले आहेत.

HB_POST_END_FTR-A2

.