Pimpri: विषय समित्यांसाठी राष्ट्रवादीने मागविले नगरसेवकांचे अर्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विषय समिती सदस्यांची निवड येत्या सोमवारी (दि.20) सर्वसाधारण सभेत होणार आहे. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या इच्छुक नगरसेवकांचे अर्ज मागविले आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विधी समिती, शहर सुधारणा समिती, महिला व बाल कल्याण समिती आणि क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समितीच्या सदस्यपदाच्या नियुक्त्या 20 मे रोजी होणा-या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत होणार आहेत.

  • महापालिकेच्या या समित्यांमध्ये एकूण नऊ सदस्य असतात. नगरसेवकांच्या संख्याबळानुसार सदस्यांची नियुक्ती केली जाते. राष्ट्रवादी काँग्रेसचे 36 नगरसेवक असून प्रत्येक समितीत राष्ट्रवादीच्या तीन सदस्यांची वर्णी लागते.

या सर्व समित्यांमध्ये सदस्यपदासाठी इच्छूक असणा-या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी लेखी अर्ज देणे आवश्यक आहे. संबंधित इच्छूकांनी आपले अर्ज विरोधी पक्षनेते कार्यालयात समक्ष आणून द्यावेत, असे आवाहन महापालिकेचे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.