Pimpri: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पार्थ पवार यांनी घेतला शहरातील कोरोना परिस्थितीचा आढावा

Pimpri: NCP leader Parth Pawar took stock of the situation in Corona in the city

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पार्थ पवार यांनी आज (शनिवारी) पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कोरोना वॉररूमला भेट दिली. शहरातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. प्रशासनाला विविध सूचना दिल्या.

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. शहराच्या संपूर्ण भागात कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. मागील काही दिवसांपासून रुग्णवाढीचा आलेख चढता आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सोमवारपासून लॉकडाऊन जाहीर केला आहे.

उपमुख्यमंत्री, तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी आज पालिकेच्या वॉर रूमला भेट दिली. शहरातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला.  आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यासोबत चर्चा करून शहरातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. याशिवाय महापालिकेच्या प्राथमिक शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या प्रश्नाबाबत चर्चा केली. सदर प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावू, अशी खात्री आयुक्तांनी दिल्याचे पार्थ पवार यांनी सांगितले.

या वेळी, डी.वाय.पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या विश्वस्तांशी देखील भेट झाली. डी.वाय.पाटील वैद्यकीय महाविद्यालय आणि यशवंतराव चव्हाण मेमोरिअल हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने कोव्हिड रुग्णांसोबतच नॉन-कोव्हिड रुग्णांसाठी वॉर्ड उभारुन शहरातील नॉन-कोव्हिड रुग्णांच्या उपचारांसाठी महत्त्वाची सोय केली आहे. यासाठी डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे त्यांनी आभार मानले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.