Pimpri: राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पवार साहेबांची साथ सोडू नये – रामदास आठवले

एमपीसी न्यूज – शरद पवार महाराष्ट्रातले चांगले नेते आहेत. तसेच जाणकार नेते आहेत. शेतक-यांसाठी, मराठा समाजासाठी, दलितासांठी त्यांच्या कालखंडात त्यांनी चांगले काम केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील लोकांना आपण सत्तेत येऊ की नाही? अशी शंका वाटत आहे. ज्यांना सत्ता हवी आहे ते राष्ट्रवादीचे लोक भाजप-शिवसेनेत जात आहेत.परंतु, त्यांनी पवारसाहेबांची साथ सोडायला नको आहे, असे परखड मत आरपीआयचे अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज (शनिवारी) निगडीत पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेते, आमदार, पदाधिकारी घाऊक पद्धतीने सत्तेतील भाजप-शिवसेनेत प्रवेश करत आहेत. याबाबत विचारले असता आठवले म्हणाले, शरद पवार यांनी शेतक-यांसाठी, मराठा समाजासाठी, दलितासांठी त्यांच्या कालखंडात चांगले काम केले आहे.

  • राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील लोकांना आपण सत्तेत येऊ की नाही अशी शंका वाटत आहे. परंतु, त्यांनी पवारसाहेबांची साथ सोडायला नको आहे. पण, ज्यांना सत्ता हवी आहे. निवडून येण्याची खात्री दिसत नाही. ते पक्षांतर करत आहेत.

भाजप- शिवसेनेत गेलो. तर, आपली आमदारकी राहू शकते. त्यांनतर आपल्याला सत्ता मिळू शकते,अशी भावना असणे चुकीचे अजिबात नाही. त्यामुळे येणा-यांचे मी स्वागत करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देशभर हवा आहे. देशामध्ये, महाराष्ट्रात भाजपचे सरकार आहे, असेही ते म्हणाले.

  • पवार साहेब आणि राष्ट्रवादीने आपले लोक सांभाळले पाहिजेत. भाजप त्यांना घेत आहे. अशा पद्घतीचे आरोप करण्यापेक्षा आपले लोक सांभाळले पाहिजेत. पवारसाहेबांना मीच सोडले आहे.तर, बाकीचे लोक त्यांच्याकडे राहतील कसे, असेही आठवले मिश्किलपणे म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.