Pimpri : गोपीचंद पडळकर यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन

एमपीसी न्यूज – उपमुख्यमंत्री अजित पवार (Pimpri) यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान करणारे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन केले. पडळकर यांना कुत्र्याची उपमा देण्यात आली.

पडळकर यांना काही लोकांनी महाराष्ट्राच्या राजकारणात सोडले आहे. ते कुणावरही आक्षेपार्ह बोलत असतात. गेल्या विधानसभा निवडणुकीत त्याचे डिपॉडिट जप्त झाले होते. आता नेत्यांच्या इशाऱ्यावर भूंकल्याशिवाय त्यांचे चालणार नाही. पण, पडळकर जे बोलत आहेत, ते त्यांच्या नेत्यांना मान्य आहे का? असा सवाल राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने केला. पडळकर यांनी सभ्यता ठेवावी, अन्यथा आम्ही त्यांचा इतिहास महाराष्ट्रासमोर (Pimpri) मांडू, असा इशारा दिला आहे.

Pimpri : जुन्या भांडणाच्या रागातून तरुणाला फायटर व कोयत्याने मारहाण

पिंपरीत शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या नेतृत्त्वाखाली झालेल्या आंदोलनात माजी नगरसेविका संगिता ताम्हाणे, शमीम पठाण, माया बारणे, माजी नगरसेवक संजय नेवाळे, राजू बनसोडे, मुख्य संघटक अरुण बो-हाडे, युवती अध्यक्ष वर्षा जगताप, युवक प्रदेश उपाध्यक्ष विशाल वाकडकर, युवक प्रदेश सरचिटणीस विशाल काळभोर, सतीश दरेकर,विनायक रणसुभे, प्रकाश सोमवंशी, पंकज भालेकर, प्रसाद कोलते, तुषार ताम्हाणे, प्रसन्ना डांगे,विजय लोखंडे, संजय औसरमल,युसुफ कुरेशी, ज्ञानेश्वर कांबळे, श्रीधर वाल्हेकर, सचिन औटे,कविता खराडे, मीरा कदम, संगीता कोकणे, गंगा धेंडे, ज्योती गोफणे, नीलम कदम, संजय दातीर पाटील, राजेंद्रसिंग वालिया, शिरीष साठे, प्रदीप गायकवाड, रवींद्र सोनवणे, सचिन वाल्हेकर, रिजवाना सय्यद, अक्षय माछरे, मंगेश बजबळकर, दिनेश पटेल, प्रतिक साळुंके, नितिन सुर्यवंशी, लवकुश यादव, मंगेश असवले, गणेश गायकवाड,निखिल घाडगे, चिन्मय कदम, संकेत जगताप, चेतन फेंगसे,अभिषेक सुर्यवंशी, रोहन शिंदे, प्रज्वल क्षीरसागर, श्रीनिवास बिरादार,सागर ओरसे, अमोल पाटील आदी सहभागी झाले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.