Pimpri: ‘जेएनयू’वरील हल्याचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसने केला निषेध

एमपीसी न्यूज – दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयात रविवारी झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसने निषेध केला. भाजप सरकार आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विरोधात निदर्शने व मूक आंदोलन करण्यात आले.

पिंपरी, खराळवाडी येथे आज (सोमवारी) राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष विशाल वाकडकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात प्रदेश सरचिटणीस संदीप चिंचवडे, विशाल काळभोर, चेतन फेंगसे, प्रतिक साळुंखे, अक्षय माछर ,वेदांत माळी, श्रीनिवास बिराजदार, शदाब खान, तुषार सोनवणे, मयुर थोरवे, फरदीन सय्यद, अशोक भडकुंबे, अजय थोरात, राजू वारभुवन, स्वप्नील कांबळे, रोशन वाघमारे, अनिल पारवे, रमन्दीप कोहली, प्रसाद कोलते, रामदास करंजकर, धनंजय जगताप, सैफ खान, राजेंद्र थोरात आदी युवकांनी सहभाग घेतला.

काय आहे प्रकरण?
जवाहरलाल नेहरू विद्यालय (जेएनयू) परिसरात रविवारी ( दि. 5) सायंकाळी काही अज्ञात लोकांनी घूसून हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. त्यांनी अचानकपणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर हल्ला चढवला. या हल्ल्यात जेएनयू विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा आईशी घोष या गंभीर जखमी झाल्या. तर, अनेक विद्यार्थी आणि शिक्षकही जखमी झालेत. ‘अभाविप’कडून हा हल्ला करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तर अभाविपने मात्र हे सर्व आरोप फेटाळले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.