Pimpri: स्थायी समिती अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे पंकज भालेकर यांचा अर्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदासाठी विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पंकज भालेकर यांचा उमेदवारी अर्ज आज (सोमवारी) दाखल करण्यात आला आहे. स्थायी समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे 4 सदस्य असून भाजप 11 सदस्यांसह बहुमतात आहे.

यावेळी विरोधी पक्षनेते नाना काटे, स्थायीचे सदस्य मयुर कलाटे, पौर्णिमा सोनवणे, माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने, नगरसेवक प्रवीण भालेकर आदी उपस्थित होते. भालेकर यांच्या अर्जावर सूचक म्हणून मयुर कलाटे तर अनुमोदक म्हणून अनुमोदक म्हणून पौर्णिमा सोनावणे यांची स्वाक्षरी आहे.

महापालिकेच्या स्थायी समितीत 16 सदस्य असतात. भाजपचे 10, राष्ट्रवादी काँग्रेसचे 4, शिवसेना 1 आणि अपक्षांचा एक नगरसेवक संख्याबळानुसार स्थायी समितीत नियुक्त झाले आहेत. अपक्ष सदस्य भाजपसोबत आहेत.

भाजपचे स्थायीत बहुमत असल्याने भाजपचा अध्यक्ष होणार हे स्पष्ट आहे. चार सदस्य असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने देखील उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे निवडणूक होण्याची शक्यता आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.