Pimpri : हवा, फळे, फुले देणा-या झाडांसमोर नतमस्तक होणे गरजेचे – सयाजी शिंदे

एमपीसी न्यूज – ‘झाडे लावा आणि ती जगवा, तीच झाडे आपली श्रीमंती आहे’. कोण काय म्हणतंय आणि कोण काय करतंय? याकडे लक्ष देवू नका. समाजात नेमका आणि अचूक विचार करणारी माणसे फार कमी आहेत. आपल्याबरोबर जेवढे आहेत त्यांना बरोबर घेवून सर्वांनी मिळून पर्यावरण संवर्धनांचे काम करुयात. निसर्ग, वृक्ष नसतील तर मानवाला अन्न-पाणी काहीच मिळाणार नाही. त्यामुळे शेतकरी जगला तर देश जगेल.एक झाड आपल्या सात ते आठ पिढय़ांना पुरणारे आहे, त्यामुळे झाडे लावूनच उत्तर द्यावे लागणार आहे. हवा, फळे, फुले देणा-या झाडांसमोर नतमस्तक होणे काळाची गरज आहे. असे मत अभिनेता सयाजी शिंदे यांनी चिंचवड येथे व्यक्त केले.

चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृह येथे अण्णासाहेब मगर सोशल स्पोर्टस फाऊंडेशनतर्फे आज रविवार (दि. 16) जूनला विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यह येथे कार्यक्रम आयोजित केला आहे. अभिनेता सयाजी शिंदे यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

  • यावेळी अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, नगरसेविका कमल घोलप, अनुराधा गोरखे, अॅड. हरिभाऊ सुरवसे, फाऊंडेशनचे अध्यक्ष गुलाब बिरदवडे आदी उपस्थित होते.

सयाजी शिंदे पुढे म्हणाले की, एक इमारत तुमच्या दोनच पिढय़ांसाठी पुरेल. मात्र, आपण लावलेले एक झाड सहा ते सात पिढय़ांसाठी उपयुक्त ठरेल.शहरी भागातील लोक उपदेशाचे डोस पाजतात. त्यांच्याकडून प्रत्यक्षात कृती होत नाही, याउलट ग्रामीण भागातील शेतकरी व जनतेमध्ये प्रेम, आपुलकी, सहकायार्ची भावना आहे. ते प्रत्यक्ष कृती तरी करतात. यापुढील काळात जो झाडे लावील तो प्रतिष्ठित अशी व्याख्या नव्याने तयार करण्यात येणार आहे. वृक्ष संवर्धनाच्या या चळवळीमध्ये मविचारी माणसे जोडली जाणार आहेत.पाणी आडवा पाणी जिरवा याची गरज सध्या आहे.

  • पुरस्कारामध्ये संतोष बारणे (पिंपरी-चिंचवडभूषण), विलास मडिगेरी (नगरसेवक), एस. बी. पाटील (जीवनगौरव), शर्मिला बाबर (नगरसेविका), नारायण बडगुजर, मुकुंद परंडवाल, मनीषा थोरात-पिसाळ (पत्रकारिता), नीलेश वर्मा, भीमसेन अग्रवाल, अॅड. राजेंद्र मुथा, रमेश पवार, शंकर जगताप, डॉ. धनंजय वर्णेकर, राजेंद्र सिंह, अॅड. प्रफुल्ल टिळेकर, अमित फरांदे, देवेंद्र बाकलीवाल, किरण चोपडा, रामभाऊ कुदळे, बिजी गोपकुमार, बाळासाहेब शेलार, चंद्रकांत गावडे, भास्कर फडतरे, विनोद मालू, धनाजी कुंभार. एम. व्ही. परमेश्वरन. हेमंत चिंचोळकर, मनीषा पानसरे, अमित भोईटे, के. एस. रवी, हनुमंत जाधव, मनोहर मुळे. आशिष राणे, मेघना मोघे, मच्छिंद्रनाथ कदम, नूतन आगज्ञान, विजय पुजारी आदींना पुरस्कार प्रदान करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक गुलाब बिरदवडे यांनी केले. सूत्रसंचालन संजय भुजबळ यांनी केले. आभार रामचंद्र जाधव यांनी मानले. कार्यक्रमाचे संयोजन ज्योती सोनार, सुषमा वैद्य, दशरथ बनकर, सुनील कानपिळे, रमेश राऊत यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.