BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी विमेन हेल्पलाईनचा पुढाकार

वुमेन हेल्पलाईनची स्थापना करणाऱ्या नीता परदेशी

एमपीसी न्यूज – अल्पवयीन बालिकेपासून ते प्रौढ महिलांपर्यंत कोणत्याही स्त्रीवर बलात्कार करून हत्या केल्याची वा लैंगिक शोषण झाल्याची बातमी झळकली नाही, असा एकही दिवस जात नाही, ही बाब चिंताजनकच म्हणावी लागेल. त्यासाठीच पीडित महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी पिंपरी-चिंचवडमध्ये विमेन हेल्पलाईनची स्थापना नीता परदेशी यांनी केली.

बलात्कार वा लैंगिक शोषण ही एक भयानक विकृती आहे व ती व्यक्तिसापेक्ष असल्याने तिची व्यापकताही अमर्याद व विशाल आहे. या विकृतीला रोखण्यासाठी कारण अशा पीडित महिलांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन हा कलुषित वा अन्यायकारकच असतो.बलात्कारासारख्या संकटांना सामोरे जाताना मात्र मनोदौर्बल्याचाच परिचय घडवितात, यावरून स्त्रियांची आत्मप्रतिष्ठा आजही धोक्यात आहे. वुमेन हेल्पलाईनच्यावतीने नोव्हेंबर 2018 ते आजपर्यंत विमेन हेल्पलाईन (महिला अत्याचारविरोधी समिती) हे व्यासपीठ शहरात स्थापन करण्यात आले आहे.

देशात दिवसेंदिवस महिला व मुलींवर अत्याचार वाढत आहेत. त्यांचे स्वरुपही भयावह होत चालले आहे. महिला व मुलींवर होणारे अत्याचार ही आजची समस्या नाही. तर भारतात हिंसाचार व अत्याचाराच्या घटना पूर्वीपासूनच घडत आहेत. विमेन हेल्पलाईनच्या माध्यमांतून अनेक समस्या निकाली काढल्या गेल्या आहेत.

नीता परदेशी म्हणाल्या, “महिलांवर होणारे अत्याचार दिवसेंदिवस वाढत आहे. अजूनही स्त्री कौटुंबिक अत्याचाराच्या बळी आहेत. लैंगिक अत्याचाराच्या बळी स्त्रियाच आहेत, परंतु जिथे समाज जागृत आहे, जिथे संघटना आहेत, या संघटना जनजागृतीचे काम करतात. महिला स्वत:च्या हक्काविषयी जागृत आहेत, तिथे महिलांना सन्मान मिळतो. ब-याच वेळा लैंगिक शोषणाविरुद्ध महिला तक्रार करायला घाबरतात. कारण त्यांना घरातून तसेच समाजातून पाठिंबा मिळत नाही, याला आपली समाज व्यवस्था कारणीभूत आहे, हे नाकारून चालणार नाही. नवीन कायदा अद्याप तळागाळापर्यंत पोहोचलेला नाही. स्त्रियांना आत्मप्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी स्वत: स्त्रियांना आत्मसन्मानासाठी प्रशिक्षित करून स्त्रियांनीच आत्मसन्मानतेचे लढे उभारले पाहिजेत. आतापर्यंत विमेन हेल्पलाईनच्या माध्यमांतून 30 ते 40 प्रकरणांची सोडवणूक करण्यात यश आले आहे” त्यांच्या कामात त्यांना सावित्री मोरे, हेमा वाकळे, दीपा फेंगर, दमयंती परदेशी, अनिता सोनवणे, स्मिता दुसाने, शैलजा गुरव यांची मदत होते. कायदेशीर सल्लागार म्हणून अॅड. सुभाष म्हात्रे, अॅड. महेंद्र कुंकर हे काम पाहतात असे नीता परदेशी यांनी सांगितले.

.