Pimpri: महापालिका रुग्णालयात दाखल असलेल्या 35 पैकी 34 जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह

एमपीसी न्यूज – कोरोना संशयित म्हणून पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या रुग्णालयात दाखल झालेल्या 35 पैकी 34 जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. तर एकाचा आणि दिल्लीतून आलेल्यांच्या ‘हाय रिस्क कॉन्टॅक्ट’मधील सहा जणांचे रिपोर्ट प्रलंबित आहेत.

कोरोना संशयित असलेल्यांना गुरुवारी महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामध्ये आणि भोसरीतील नवीन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचे रिपोर्ट तपासणीसाठी एनआयव्हीकडे पाठविण्यात आले होते. त्यातील 35 पैकी 34 जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत.

शहरात आता कोरोनाचे तीन रुग्ण आहेत. पहिल्या बारापैकी एक आणि दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमातून आलेले दोन पॉझिटीव्ह असे तीन कोरोनाग्रस्त रुग्ण आहेत. या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.