Tree collapsed : नेहरू नगर येथील गुलाब पुष्प उद्यानाजवळ झाडपडीची घटना 

एमपीसी न्यूज : नेहरू नगर येथील गुलाब पुष्प उद्यानाजवळ झाडपडीच्या घटनेची नोंद करण्यात आली आहे. काल रात्री या परिसरात पार्क करण्यात आलेल्या तीन दुचाकींवर हे झाड कोसळले. (Tree collapsed)अग्निशमन कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी पोहचून झाड कापून रस्ता मोकळा केला.

Vadgaon Maval : वडगावमधील तिघांचा निक्षय मित्र म्हणून राज्यपालांच्या हस्ते गौरव

नेहरू नगर येथील गुलाब पुष्प उद्यानाजवळ काल रात्री झाडपडीच्या घटनेची नोंद करण्यात आली. याबाबत अधिक माहिती देताना विकास नाईक, लीडिंग फायरमन, अग्निशमन विभाग पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांनी सांगितले की, काल रात्री 10.40 वा हे झाड पडले होते.(Tree collapsed) अग्निशमन विभागाच्या पिंपरी मुख्यालयाचा एक अग्निशमन बंब घटनास्थळी पाठवण्यात आला होता. अग्निशमन कर्मचाऱ्यांनी तात्काळ झाड कापून रस्ता मोकळा केला. यामध्ये कोणतीही जिवितहानी झाली नाही. 3 दुचाकींवर झाड कोसळ्याने गाड्यांचे किरकोळ स्वरूपाचे नुकसान झाले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.