Pimpri News : नेहरुनगर येथे पाण्याची पाईपलाईन फुटली, हजारो लीटर पाणी वाया

एमपीसी न्यूज – पिंपरी, नेहरुनगर येथील संतोषी माता चौकात महापालिकेची पाण्याची पाईपलाईन फुटल्याने हजारो लीटर पाण्याची नासाडी झाली. (Pimpri News) रस्त्यावर पाणीच पाणी झाले आहे. या भागातील नागरिकांना आज (मंगळवारी) दिवसभर पाणीपुरवठा झाला नाही. त्यामुळे नागरिकांचे हाल झाले.

मागील तीन वर्षांपासून पिंपरी-चिंचवड शहरात दिवसाआड पाणीपुरवठा सुरु आहे. नागरिकांना दिवसातून एकवेळेसच पाणीपुरवठा होत आहे. एक दिवसाआड होणा-या पुरवठ्यामुळे नागरिकांच्या तक्रारी असताना दुसरीकडे पाईपलाईन फुटल्याने हजारो लीटर पाण्याची नासाडी झाली आहे. नेहरुनगर येथील पाईपलाईनचा व्हॉल तुटला. सायंकाळी सहाच्या दरम्यान ही घटना घडली. पाईपलाईन फुटल्याने पाणी मोठ्या प्रमाणात वाया गेले. रस्त्यावर पाणीच पाणी झाले आहे.

Pune News : लॉयला आंतरशालेय फुटबॉल स्पर्धा, कल्याणी स्कूलचा चमकदार विजय

कार्यकारी अभियंता रामनाथ टकले म्हणाले, वॉल तुटला आहे. तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. दोन तासामध्ये दुरुस्तीचे काम पूर्ण होईल.

स्थानिक नागरिक समीर पाटील म्हणाले, नेहरुनगर परिसरात आज दिवसभर पाणीपुरवठा झाला नाही. त्यामुळे नागरिकांचे हाल झाले. पाणीपुरवठा विभागाने तातडीने दुरुस्ती करावी.(Pimpri News) या भागाला जास्त वेळ पाणीपुरवठा करण्यात यावा.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.