एमपीसी न्यूज – पिंपरीतील नेपाळी मार्केटमध्ये पुणे महामेट्रोने 100 गाळे बांधून देत महापालिकेच्या भूमि आणि जिंदगी विभागाकडे हस्तांरित केले आहेत. 65 फेरीवाल्यांसाठी यापूर्वीच लकी ड्रॉ काढण्यात आला होता. उर्वरित 28 गाळ्यांसाठी मंगळवार (दि.22) लकी ड्रॉ काढून गाळे देण्यात आले. तर, सात फेरीवाल्यांचा महापालिकेकडून शोध सुरू आहे.
मेट्रोच्या कामामुळे विस्थापित झालेल्या पिंपरीतील नेपाळी मार्केटमधील फेरीवाल्यांसाठी मेट्रोने 100 गाळे बांधून दिले आहेत. 100 पात्र फेरीवाल्यांची यादी ह प्रभागाने भूमि व जिंदगी विभागाकडे दिली आहे. त्यानुसार पात्र फेरीवाल्यांना पाच वर्षांसाठी भू भाडे, हॉकर्स फी म्हणून जीएसटीसह (Pimpri News) 88 हजार 775 रूपये भरण्यास महापालिकेने सांगितले आहे. या गाळेधारकांबरोबर सुरूवातीला 11 महिन्यांचा करार करण्यात येणार आहे. 65 फेरीवाल्यांनी ह प्रभागात पहिला आणि दुसरा हप्ता भरला आहे. या फेरीवाल्यांकडे प्रत्येकी 20 हजार रूपयांचे दोन हप्ते आणखी बाकी आहेत. या फेरीवाल्यांना पैसे भरण्याच्या सूचना महापालिकेने केल्या आहेत.
Shahunagar accident : शाहुनगर येथील अपघातात शालेय विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू
याबाबत भूमि आणि जिंदगी विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत जोशी म्हणाले, नेपाळी मार्केटमधील गाळ्यांसाठी यापूर्वी 65 गाळ्यांचा लकी ड्रॉ झाला आहे.(Pimpri News) या फेरीवाल्यांनी पहिला आणि दुसरा हप्ता जमा केला आहे. मंगळवारी 28 फेरीवाल्यांचा ह प्रभागात लकी ड्रॉ काढण्यात आला. तर सात फेरीवाल्यांचे पत्ते सापडत नाहीत. त्यामुळे फेरीवाल्यांना लवकरच करार करून गाळे ताब्यात देण्यात येणार आहेत.