Pimpri : व्हिडीओ रेकॉर्डिंग करून नेपाळी तरुणाची आत्महत्या

एमपीएसी न्यूज- माझ्या आत्महत्येला कोणाला जबाबदार धरू नये असा व्हिडीओ रेकॉर्डिंग करून नेपाळी तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. काळेवाडी विजयनगर येथे बुधवारी (दि.27) सायंकाळी साडेचारच्या सुमारास ही घटना घडली.

दीपक अमर बहादूर (वय 19 रा. रेड चायनीज हॉटेल, विजयनगर काळेवाडी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

बहादूर याचे काळेवाडी येथे चायनीज सेंटर आहे. बुधवारी सायंकाळी घरात एकटा असताना त्याने आपण आत्महत्या करत असून कोणाला जबाबदार धरू नये अशा आशयाचा नेपाळी भाषेत व्हिडीओ रेकॉर्ड केला. त्यानंतर घराच्या छताच्या लोखंडी अँगलला नायलॉन दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला. त्याच्या सहकाऱ्याने हा प्रकार पहिला असता त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र पोलिसांनी उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. वाकड पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.