Pimpri: पन्नाशी ओलांडली! चार जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटीव्ह, सक्रिय रुग्णांची संख्या 39

आजपर्यंत शहरातील 52 जणांना कोरोनाची लागण;12 रुग्ण कोरोनामुक्त

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाच्या रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. गुरुवारी (दि.16) रात्री उशिरा आलेल्या रिपोर्टमध्ये एक महिला आणि तीन पुरुष असे चार जणांचे  रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत.  त्यामुळे शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या 39 वर पोहचली आहे. शहरातील 52 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. त्यापैकी 12 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

महापालिकेने 99 संशयित रुग्णांच्या घशातील द्रावाचे नमुने आज गुरुवारी तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था (एनआयव्हीकडे) पाठविले होते. त्याचे रिपोर्ट रात्री उशिरा  आले आहेत.  त्यात एका महिलेसह चार जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.  बुधवारी रात्री पॉझिटिव्ह आलेल्या कोरोना बाधित रुग्णांच्या हाय रिस्क कॉन्टॅक्टमधील ही 42 वर्षाची महिला रुग्ण आहे.  तर,19, 31 आणि 33 वयोमान असलेल्या पुरुषांचेही रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत.  त्यामुळे त्यांना कोरोनाची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. तेही हाय रिस्क कॉन्टॅक्टमधील असून चारही रुग्ण भोसरी भागातील रहिवाशी आहेत.

मागील आठ दिवसांत 31 नवीन रुग्णांची भर!

शहरात 8 एप्रिल पासून दररोज कोरोनाचे पॉझिटीव्ह रुग्ण येत आहेत. 8 एप्रिलला एक, 9 ला तीन, 10 एप्रिल रोजी चार, 11 एप्रिलला दोन , 12 एप्रिलला पाच, 13 एप्रिल रोजी दोन, 14 एप्रिल  रोजी एकाच दिवशी सहा, 15 एप्रिल रोजी चार जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले होते. 16 एप्रिलला चार जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याने मागील आठ दिवसात तब्बल 31 नवीन रुग्णांची भर पडली आहे.

दरम्यान, 10 मार्चपासून पिंपरी-चिंचवड शहरातील 52 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. त्यापैकी 12 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. कोरोना बाधित सक्रिय 39 रुग्ण शहरात आहेत. त्यातील 35 रुग्णांवर महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर, चार सक्रिय कोरोना बाधित रुग्णांवर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रविवारी (दि.9) एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.