Pimpri : पोलीस आयुक्‍तालयाच्या उद्‌घाटनाचा मुहूर्त 9 जानेवारीला?

एमपीसी न्यूज – प्रेमलोक पार्क येथील पोलीस आयुक्‍तालयाच्या इमारतीचे काम पूर्ण झाले आहे. येत्या एक जानेवारीपासून येथील कार्यालयात कामकाज सुरू होणार आहे. तसेच, नऊ जानेवारी रोजी मुख्यमंत्र्यांची वेळ मिळाल्यास उद्‌घाटनही होणार असल्याची माहिती पोलीस आयुक्‍त आर के पद्‌मनाभन यांनी दिली.

पिंपरी- चिंचवडचे पोलीस आयुक्‍तालय 15 ऑगस्ट रोजी कार्यान्वित झाले. आयुक्‍तालयासाठी प्रेमलोक पार्क येथील महापालिकेची शाळा घेण्यात आली. मात्र, या इमारतीत आवश्‍यक ते फर्निचर आणि बदल करण्याचे काम सुरू होते. यामुळे ऑटोक्‍लस्टर येथील इमारतीमध्ये पोलीस आयुक्‍त, अप्पर आयुक्‍त आणि उपायुक्‍त यांचे कार्यालय सुरू केले. पोलीस नियंत्रण कक्षाचे कामकाज पिंपरी पोलीस ठाण्याच्या मागील बाजूस असलेल्या व्यायामशाळेत सुरू करण्यात आले.

प्रेमलोक पार्क येथील पोलीस आयुक्‍तालयात एक जानेवारीपासून साहित्य स्थलांतर केले जाणार आहे. या नवीन पोलीस आयुक्‍तालयात आयुक्‍त कक्ष, अपर आयुक्‍त कक्ष, नियंत्रण कक्ष याशिवाय पीसीबी आणि एमओबीचे कार्यालयदेखील असणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.