Pimpri : झुलेलालच्या जयघोषात सिंधी बांधवाचे नववर्ष उत्साहात

एमपीसी न्यूज -“आयो लाल झुलेलाल’च्या जयघोषात सिंधी समाजाचे आद्य दैवत असलेल्या संत झुलेलाल यांची जयंती आणि सिंधी नववर्ष दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्त आयोजित केलेल्या चेटीचंड उत्सवात सिंधी बांधव सहभागी झाले होते.

भगवान झुलेलाल यांची प्रतीमा व प्रज्वलित ज्योतीसह काढण्यात आलेल्या शोभायात्रेत ‘जय झुलेलाल’चा जयघोष करण्यात आला. संत झुलेलाल मंदिरापासून संत झुलेलाल यांची मिरवणुक काढण्यात आली. या मिरवणुकीत लहान मुलापासून ते वृध्दांपर्यंत सर्वांनी आनंदाने सहभाग घेतला. आयो लाल झुलेलालचा जयघोष यावेळी केला.

  • याबाबत माहिती देताना संत झुलेलाल मंदिर ट्रस्टचे सचिव जवाहर कोटवानी म्हणाले, “चेटीचंड यादिवशी संत झुलेलाल यांचा जन्म झाला होता. त्यामुळे सिंधी समाजातील हा सर्वात शुभ दिवस मानला जातो. आजच्या दिवशी सिंधी बांधव एकमेकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतात, नदीपात्रात आज आख्खा म्हणजेच तांदूळ, वेलची, हळद, साखर व गुलाबाची पाकळी यांचे मिश्रण नदीपात्रात टाकले जाते.

मास्तर बल्लुमल, ताराचंद भगवानदास लालवानी, प्रताप बजाज, कुमार मोटवानी, पप्पू तेजवानी लच्छु तुलसानी आदींनी मिरवणुकीचे संयोजन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.